महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Pak Girl Fell In Love With Up Boy : मोबाईलवर गेम खेळताना रंगला इश्काचा खेळ, प्रियकरासाठी पाकिस्तानच्या तरुणीने नेपाळमार्गे गाठले बंगळुरू

मोबाईलवर लुडो गेम खेळताना पाकिस्तानच्या तरुणीला उत्तर प्रदेशातील तरुणाशी प्रेम झाले. या प्रेमातून पाकिस्तानच्या तरुणीने नेपाळमार्गे भारतात प्रवेश करत बंगळुरू गाठले. मात्र ही बाब पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी सदर तरुणीला आरएफओकडे सोपवले. तर तिच्या प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. इकरा जीवनी असे त्या पाकिस्तानच्या तरुणीचे नाव आहे.

Pak Girl Fell In Love With Up Boy
इकरा आणि मुलायम सिंह

By

Published : Jan 23, 2023, 10:02 PM IST

बंगळुरू - मोबाईलवर गेम खेळता खेळता पाकिस्तानच्या तरुणीचा उत्तरप्रदेशच्या मुलासोबत इश्काचा खेळ रंगला. त्यामुळे ती पाकिस्तानवरुन नेपाळमार्गे घुसखोरी करत बंगळुरूत धडकली. मात्र बंगळुरू पोलिसांनी तिच्या प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. इकरा जीवनी असे त्या नेपाळमार्गे घुसखोरी करुन भारतात आलेल्या पाकिस्तानच्या मुलीचे नाव आहे. तर मुलायम सिंह असे त्या उत्तर प्रदेशच्या मुलाचे नाव आहे. मुलायम सिंह यादव हा बंगळुरूत सुरक्षा रक्षकाचे काम करतो. इकरा पाकिस्तान सोडून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात आली होती.

पाकिस्तानात आईशी संपर्क साधण्याचा केला प्रयत्न :इकराचा प्रियकर मुलायम सिंह हा बंगळुरूमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. हे दोघेही शहरातील सर्जापूर रोडवरील जुन्नसंद्रा येथे राहत होते. इकरा जीवनीने पाकिस्तानात असलेल्या तिच्या आईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर विभागाने या प्रकरणी तपास सुरू केला. याबाबतची माहिती त्यांनी बंगळुरू पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी विशेष ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी इकरा जीवनी आणि मुलायम सिंह यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता ही घटना उघडकीस आली.

दोघांनी लग्न करण्याचा घेतला निर्णय :मोबाईलवर गेम खेळताना हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यामुळे इकरा जीवनी हिने नेपाळमार्गे घुसखोरी करत बंगळुरू गाठले. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत व्हाईटफिल्ड डिव्हिजनचे पोलीस उपायुक्त एस गिरीश यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. इकरा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काठमांडू, नेपाळमार्गे भारतात आली होती. त्यानंतर ती बेलंदूर पोलीस ठाण्यांतर्गत लेबर क्वार्टरमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सध्या इकराला एफआरओकडे सोपवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तर तिचा प्रियकर मुलायम सिंह यादवला अटक करण्यात आल्याचेही उपायुक्त एस गिरीश यावेळी म्हणाले.

इकराने बदलले होते नाव :इकराला पोलिसांनी पकडून एफआरओकडे सोपवले. यावेळी पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. त्यामध्ये इकराने आपले नाव बदलून रवा यादव असे ठेवले होते. तिने पासपोर्टसाठीही अर्ज सादर केला होता. पोलिसांनी याप्रकरणी बेलंदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - Tunisha Sharma Suicide Case : अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरण! शिझान खान जामीनासाठी उच्च न्यायालयात

ABOUT THE AUTHOR

...view details