महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Osmanabad Crime : घरफोडी प्रकरणी वडील फिर्यादी तर मुलगाच आरोपी, पोलीसांकडून मुद्देमाल जप्त

घरफोडी प्रकरणी आरोपी ( Accused ) फिर्यादीचा मुलगा निघाला असून, आंबी पोलीसांनी ( Ambi Police ) हा गुन्हा उघडकीस आणला आहे. यावेळी 2 आरोपींना अटक ( accused arrested ) करून चोरलेली रक्कम जप्त करण्यात आली.

घरफोडी प्रकरण उस्मानाबाद
घरफोडी प्रकरण उस्मानाबाद

By

Published : Jul 9, 2022, 1:22 PM IST

उस्मानाबाद -परंडा ( Paranda ) तालुक्यातील उंडेगाव येथील अरविंद शेरे यांच्या घरफोडी प्रकरणी आरोपी ( Accused ) त्यांचाच मुलगा निघाला असून, आंबी पोलीसांनी ( Ambi Police ) हा गुन्हा उघडकीस आणला आहे. यावेळी 2 आरोपींना अटक ( accused arrested ) करून चोरलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ( Police inspector ) आशिष श्रीनिवास खांडेकर यांनी यावेळी दिली आहे.

गाव परिसरात यापूर्वी अनेकवेळा चोरी -परंडा तालुक्यातील उंडेगाव येथील अरविंद शेरे यांची घरपोडी करून, अज्ञात चोराने रोख रक्कम चोरली होती. याप्रकरणी आंबी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी चोरीचा तपास पोलिसांनी सुरू केला होता. याप्रकरणी सुनील अरविंद शेरे व प्रवीण भक्तीदास शेरे या दोघांनी गाव परिसरात यापूर्वी अनेकवेळा चोरी केल्याने त्यांना आंबी पोलिसांनी अटक केली होती. या 2 आरोपींची दुसऱ्या गुन्ह्यात उस्मानाबादच्या कारागृहात रवानगी केली होती. आरोपींची कारागृहात रवानगी करण्यापूर्वी उंडेगाव येथील अरविंद शेरे यांची घरपोडी झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तपासाला आंबी पोलिसांनी सुरुवात केली होती. यावर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

गावात चर्चेचा विषय ठरला- याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी भुम यांच्या मार्गदर्शनाखाली आंबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर पोना. एस. पी शिंदे. पोकॉ. सतीश राऊत, पोकॉ सोनटक्के, यांच्या पथकाने तपास केला असता, उंडेगाव येथील अरविंद शेरे यांची घरफोडी त्यांचा मुलगा सुनील शेरे याने प्रविण शेरे याच्या मदतीने केली आहे. घरफोडी करुन चोरी केल्याची खात्री पटल्याने, आंबी पोलिसांनी 2 आरोपींना उस्मानाबादच्या कारागृहामधून ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. आरोपींनी चोरी केल्याचे कबुल केले, तर या घटनेचा पुढील तपास पोना.शिंदे हे करत आहेत. या घटनेमुळे गावात मुलानेच वडीलांच्या घरी मित्राच्या मदतीने चोरी केल्याने परीसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा -माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details