शिक्रापूर(पुणे)- शिक्रापूर परिसरात बेकायदेशीरपणे रेमडीसिवीर इंजेक्शन विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चार रेमडीसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात करण्यात आली आहेत. शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई केली. अमित देविदास पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
बेकायदेशीरपणे रेमडीसिवीर इंजेक्शन विक्री करण्याऱ्या युवकास अटक - रेमडीसिवीर इंजेक्शन विक्री करण्याऱ्या युवकास अटक
शिक्रापूर येथील बजरंगवाडी परिसरात एक युवक बेकायदेशीरपणे रेमडीसिवीर इंजेक्शन विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली होती. त्यांनतर पोलिसांनी बजरंग वाडी परिसरात सापळा लावला असता, त्यांना एक संशयित युवक आलेला दिसून आला.
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई जयराज वसंत देवकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अमित देविदास पवार (वय २३ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस हवालदार अमरदिन चमनशेख, पोलीस शिपाई मिलिंद देवरे, किशोर शिवणकर, लक्ष्मण शिरसकर, निखिल रावडे, अमोल दांडगे, जयराज देवकर यांसह आदींनी