मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अभिनेता दिलीप जोशी उर्फ जेठालालच्या मुलाला मुंबई पोलीस क्राईम ब्रांच युनिट 10 ने ताब्यात घेतले आहे. मुंबई कंट्रोल रूममध्ये चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्याच्यावर पोलीसांनी ठेवला आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा सिरीयल मधील टीव्ही कलाकार दीपक जोशी जेठालाल यांचा मुलगा हार्दिक जोशी याची एक ॲपवर पाकिस्तानी नागरिकांना सोबत वाद झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकाने मुंबईत बॉम्ब फोडण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँच करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
'तारक मेहता'तील दिलीप जोशी यांच्या मुलाला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अभिनेता दिलीप जोशी उर्फ जेठालालच्या मुलाला मुंबई पोलीस क्राईम ब्रांच युनिट 10 ने ताब्यात घेतले आहे. मुंबई कंट्रोल रूममध्ये चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्याच्यावर पोलीसांनी ठेवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक जोशी हा अजहर ॲपवर व्हिडिओ कॉलद्वारे ग्रृपवर बोलत होता. त्यावेळी भारत-पाकिस्तान 20 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. या विषयावर वाद झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने मुंबईमध्ये बॉम्ब फोडू, अशी धमकी हार्दिक जोशीला दिली. बॉम्बने उडवून देणाऱ्या निनावी फोनमुळे एका कलाकाराच्या मुलाला मुंबई पोलिसांनी चौकशी बोलवले होते. त्यानंतर जोशीने मुंबई कंट्रोल रूमला या सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यावेळी हार्दिक जोशी हा नशेमध्ये होता. त्यामुळे आज (शनिवारी) मुंबई पोलिसांकडून हार्दिक जोशी याचे स्टेटमेंट घेण्यात आले आणि पोलीस डायरीमध्ये या सर्व प्रकाराची एन्ट्री करण्यात आली. पुढील तपास अंधेरी पोलीस क्राईम ब्रँच करत आहे.
हेही वाचा -हबीबगंज नाही तर आता राणी कमलापती; पाहा कसं आहे देशाचं पहिलं वर्ल्ड क्लास रेल्वे स्थानक