मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल मुंबईतील समता नगर पीएस येथे प्रदीप भालेकर नावाच्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पकडण्यासाठी शोध सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. सायबर पोलीस स्टेशन ( Mumbai cyber police station ) यांनी आयटी कायद्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल ( IT Act case ) केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप भालेकर असे ( FIR against Pradeep Bhalekar ) आरोपीचे नाव आहे. तो मालाडचा रहिवासी आहे. रविवारी सकाळी त्यांनी उच्च न्यायालयाला उद्देशून आपल्या ट्विटर हँडलवर दोन पानी पत्र पोस्ट केल्याचा ( social media post against CM ) आरोप आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करताना अपमानास्पद टिप्पणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र भालेकर नावाच्या आरोपीने स्वत: हाताने लिहून पोस्ट केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांचे हस्ताक्षरही उपलब्ध आहे. त्यामुळे ही घटना घडवून आणण्यासाठी त्याला जबाबदार धरण्यात आले आहे.
भालेकर यांनी बोलणे टाळलेसोशल मीडियावर लक्ष ठेवत असताना सायबर सेलमध्ये तैनात असलेल्या एका पोलिसाला ही माहिती मिळाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भालेकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली असता, पोलिसांचे नाव ऐकताच त्यांनी फोन खंडित केला. यानंतर पोलिसांनी भालेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास सायबर सेलकडून सुरू आहे. या प्रकरणात त्याचा पोलीस शोध घेत आहेत.