महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Fake Covid Vaccination Aurangabad : औरंगाबादेत पाचशे रुपयांत लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र, सरकारी डॉक्टरांसह चौघे अटकेत - Ghati Hospital Aurangabad

नागरिकांना बहुतांश ठिकाणी लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र लसीकरण न करताही लसीकरण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र ( Fake Vaccination Certificate Gang ) देणाऱ्या टोळीचा औरंगाबादमधील पोलिसांनी भांडाफोड केला आहे. याप्रकरणी सरकारी डॉक्टरसह चार जणांना अटक ( Four Arrested With Doctor In Aurangabad ) करण्यात आली आहे.

जिन्सी पोलिस
जिन्सी पोलिस

By

Published : Dec 15, 2021, 11:07 AM IST

Updated : Dec 16, 2021, 10:00 AM IST

औरंगाबाद -कोरोना लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी ( Fake Covid Vaccination Certificate ) जिन्सी पोलिसांनी सापळा रचून ( Gang Arrested Jinsi Police Aurangabad ) पकडली आहे. 500 ते 2000 रुपये देऊन बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करत, काही जणांना पोलिसांनी अटक ( Four Arrested With Doctor In Aurangabad ) केली आहे. या टोळीमध्ये सरकारी डॉक्टर आणि नर्सचा सहभाग असल्याचं समोर आला आहे.

औरंगाबादेत पाचशे रुपयांत लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र, सरकारी डॉक्टरांसह चौघे अटकेत
बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांमध्ये डॉक्टरांचा सहभागऔरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Aurangabad Collector Sunil Chavhan) यांनी दिलेल्या आदेशानुसार, 15 डिसेंबरपासून लस न घेता रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यापूर्वी बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी सक्रिय असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे या टोळीमध्ये सरकारी डॉक्टरांचा सहभाग असल्याचं समोर आला आहे. जिन्सी पोलिसांनी डॉ शेख रुझीउद्दीन फहिमउद्दीन (वय 27), डॉ शेख मोहीउद्दीन शेख फहिमन उद्दीन (वय 36), अबू बकर अल हादी अल हमीद (वय 23), मोहम्मद मुद्दस्सीर मोहम्मद अष्पाक (वय 21) या चौघांना अटक केली आहे.असा रचला सापळाजिन्सी परिसरात असलेल्या आरोग्य केंद्रात सिस्टर आढाव आणि शहेनाज शेख सरकारी कागदपत्रांवर लस घेतल्याच्या खोटी नोंद करुन बनावट प्रमाणपत्र तयार करत असल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे (Jinsi Police Station) निरीक्षक व्यंकटेश केंद्रे (PI Vyankatesh Kendre) यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक आनंत सांगळे यांना सोबत घेत बनावट ग्राहक तयार करून टोळीतील काही जणांशी संपर्क साधला. त्यावेळी प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवली गेली. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेख गनी, जफर पठाण, संतोष बमनात, सरीता कुंडारे, परदेशी यांनी घेराव घालून डॉक्टर भावंडांसह कामगार अबूबक्र मोहंमद मुदस्सीर यांना व्यवहार करून प्रमाणपत्र देताना रंगेहात पकडले.चारशेहून अधिक प्रमाणपत्र दिल्याचा संशययाप्रकरणी जिन्सी पोलिसांनी अधिक तपास केला असता, या टोळीने औरंगाबाद शहरात चारशेहून अधिक बनावट प्रमाणपत्र दिल्याची प्राथमिक माहितीही समोर आली आहे. या सर्व टोळीत घाटी रुग्णालयात (Ghati Hospital Aurangabad) कार्यरत असलेल्या डॉ. रझिउद्दीन या टोळीचे प्रमुख होते. त्यांच्या माध्यमातूनच ही टोळी काम करत होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Last Updated : Dec 16, 2021, 10:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details