महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

खोपोलीत उभ्या स्विफ्ट कारच्या दोन चाकांची चोरी - स्विफ्ट कारचे दोन टायर चोरीला

शेतात उभ्या करण्यात आलेल्या स्विफ्ट कारचे टायरसह २ चाके चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

खोपोलीत उभ्या स्विफ्ट कारच्या दोन चाकांची चोरी
खोपोलीत उभ्या स्विफ्ट कारच्या दोन चाकांची चोरी

By

Published : Mar 20, 2021, 12:54 PM IST

रायगड - धनगर समाजाचे नेते आणि दस्तूरी येथे राहणारे ग्रामस्थ बबन शेडगे यांच्या स्विफ्ट कारची २ चाके अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी गाडीचे केवळ पुढच्या बाजुचेच चाके चोरल्याने या अजब चोरीची एकाबाजुला चर्चा रंगत आहे.

खोपोलीत उभ्या स्विफ्ट कारच्या दोन चाकांची चोरी

खोपोली पोलिसात तक्रार दाखल-

बबन शेडगे यांची स्विफ्ट कार (क्रमांक एम.एच.12.इ.जी.1992) दस्तूरी येथील अमृतांजन ब्रिजच्या खाली जनावरांच्या गोठ्याजवळ उभी कऱण्यात आली होती. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कारची पुढील दोन चाके चोरून नेली. आज सकाळी शेंडगे यांनी कारची पाहणी केली असता, चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बबन शेडगे हे धनगर समाजाचे जेष्ठ नेते असून ते रासपचे माजी जिल्हाध्यक्ष राहिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details