महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

India Vs Pak Match Betting Case : भारत-पाक क्रिकेट सामन्यावर लाखोंचा सट्टा घेणारा बुकी पुणे पोलिसांच्या ताब्यात - Pune Crime Case

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा ( De Mora Pub in Bundagarden Police Station ) लावणाऱ्या नामांकित बुकीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डी मोरा पबमध्ये हा सट्टा लावण्यात आला होता. तेथून लाखो रुपयांची रोकड जप्त ( Cash Worth Lakhs of Rupees has been Seized ) करण्यात आली आहे. त्याशिवाय मोबाईल, सट्टा लावण्यासाठी आवश्यक साहित्य ताब्यात ( India Pakistan Cricket Match on Betting ) घेण्यात आले आहे.

India Vs Pak Match Betting Case
भारत-पाक क्रिकेट सामन्यावर लाखोंचा सट्टा

By

Published : Sep 5, 2022, 9:45 AM IST

पुणे : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावणाऱ्या नामांकित बुकीला पुणे पोलिसांच्या ( De Mora Pub in Bundagarden Police Station ) गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डी मोरा पबमध्ये हा सट्टा लावण्यात आला होता. तेथून लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय मोबाईल, सट्टा लावण्यासाठी आवश्यक साहित्य ताब्यात घेण्यात ( India Pakistan Cricket Match on Betting ) आले ( Cash Worth Lakhs of Rupees has been Seized ) आहे.

भारत-पाक क्रिकेट सामन्यावर लाखोंचा सट्टा


श्रीपाद यादव असे ताब्यात घेण्यात आलेला बुकीचे नाव : काल एशिया कप स्पर्धेतील सुपर 4 मध्ये दुसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला. या सामन्याच्या वेळी पुणे शहराच्या मध्यवस्तीतील डी-मोरा पबमध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने रात्री उशिरा पबमध्ये छापा टाकून श्रीपाद यादव नामक बुकीला ताब्यात घेतले. तो पबमध्ये दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यावर बुकिंग घेऊन सट्टा घेत असल्याचे उघडकीस आले. यावेळी पोलिसांनी लाखो रुपयांची रोकड, मोबाईल, साहित्य जप्त केले आहे.

हेही वाचा :PM Narendra Modi Meet Teachers : आज शिक्षक दिन; पंतप्रधान मोदी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांसोबत साधणार संवाद

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details