धुळे - शहरातील साक्री रोड येथील राजीव गांधी नगरात गुरुकुल हायस्कूलच्या मागे राहत असलेल्या रविंद्र काशिनाथ पगारे या तरुणाचा खून झाला ( Murder In Dhule ) आहे. मयत रवींद्र पगारे यांच्या भावाचे घर भाड्याने मागितले असता, ते दिले नाही म्हणून मारेकर्यांने रागाच्या भरात हा खून केला ( Murder For Not Renting House In Dhule) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मारेकर्याने सायंकाळी 6.30 ते 7 च्या सुमारास घरात घुसून रवींद्र पगारे याच्यावर पोटात धारदार शस्त्राने दोन वार केले. पगारे हा रक्ताच्या थारोळ्यात घरात जागीच मरण पावला.
पोलिसांनी फिरवली तपासाची सूत्रे
Murder In Dhule : घर भाड्याने दिले नाही म्हणून तरुणाच्या पोटात केले धारदार शस्राने वार, जागेवरच पडला रक्ताच्या थारोळ्यात - धुळे शहर पोलीस ठाणे
कुणाला कधी कशाचा राग येईल हे सांगता येत नाही. असाच एक प्रकार धुळ्यात घडला आहे. घर भाड्याने न दिल्याचा राग सहन न झाल्याने एकाने तरुणाच्या पोटात धारदार शस्राने वार ( Murder For Not Renting House In Dhule) केले. या हल्ल्यात त्या तरुणाचा जागेवरच मृत्यू ( Murder In Dhule ) झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले ( Dhule Police Cracked Murder Case ) आहे.
घर भाड्याने दिले नाही म्हणून धुळ्यात खून
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांचे पथक तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता अवघ्या काही तासातच मारेकऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आले ( Dhule Police Cracked Murder Case ) आहे. आरोपीने खून का केला? याचा पुढील तपास पोलिस करत आहेत, अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली.