हैदराबाद (तेलंगणा) : हैदराबादमध्ये 15 दिवसांत आणखी एक ऑनर किलिंगची घटना ( Honor Killing In Hyderabad ) घडली. बेगमबाजार येथील मच्छी मार्केटमध्ये ( Begumbazar Macchi Market ) पाच गुंडांनी एका व्यक्तीचा भोसकून खून केला. नीरज पनवार असे पीडित तरुणाचे नाव आहे. वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या तरुणाची पत्नीच्या घरच्यांनी वार करून हत्या ( Begumbazar honor killing case ) केली. स्थानिकांनी सांगितले की, नीरज पनवारवर जवळपास 20 वार करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उस्मानिया रुग्णालयात हलवला. गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे.
लग्नाला होता विरोध :एसीपी सतीश कुमार आणि सीआय अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगमबाजार, कोळसावाडी येथील नीरज कुमार पनवार (२२) हे भुईमुगाचा व्यवसाय करतात. त्याच परिसरातील संजना (20) हिच्यावर त्याचे प्रेम जडले आणि दीड वर्षापूर्वी तिच्याशी लग्न केले. त्यांच्या घरी दीड महिन्यापूर्वी मुलगा झाला. संजनाच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता आणि लग्न झाल्याने ते संतापले होते. संजनाचा भाऊ सहा महिन्यांपासून नीरजला मारण्याची संधी शोधत होता. संजनाच्या भावाने आठवडाभर नीरजवर पाळत ठेवली.
चाकूने केले सपासप वार :शुक्रवारी बाजारात फारशी गर्दी नसल्यामुळे संजनाच्या भावाने नीरजला मारण्याची संधी साधत त्याच्या मित्रांना माहिती दिली. ते सर्वजण तेथे पोहोचले आणि नीरज रस्ता ओलांडत असताना मागून आले. त्यांनी त्याच्या डोक्यावर ग्रेनाईट दगड मारला. त्यानंतर संजनाच्या भावाने नीरजवर चाकूने वार केले आणि नीरजची हत्या करून ते तेथून फरार झाले.