ठाणे -वडिलांसोबत ठाण्यात औषधोपचारासाठी आलेल्या मानसिक रुग्ण तरुण आकाश चंद्रकांत होळकर (वय 24) याने ठाणे रेल्वे स्थानकात लोकलखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. लोकल थांबवून त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ठाणे स्थानकात तरुणाची धावत्या लोकलखाली आत्महत्या
उल्हासनगर येथील आकाश हा मानसिक रुग्ण असल्याने त्याच्यावर ठाण्याच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरूवारी सकाळी तो वडिलांसोबत औषधोपचारासाठी ठाण्यात आला होता. त्यानंतर ते बापलेक सकाळी 11.30च्या सुमारास घरी परतीच्या प्रवासासाठी ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर लोकलची वाट पाहत उभे होते. दरम्यान, कल्याण लोकल फलाटावर येत असताना आकाश अचानक लोकलकडे झेपावला.
उल्हासनगर येथील आकाश हा मानसिक रुग्ण असल्याने त्याच्यावर ठाण्याच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरूवारी सकाळी तो वडिलांसोबत औषधोपचारासाठी ठाण्यात आला होता. त्यानंतर ते बापलेक सकाळी 11.30च्या सुमारास घरी परतीच्या प्रवासासाठी ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर लोकलची वाट पाहत उभे होते. दरम्यान, कल्याण लोकल फलाटावर येत असताना आकाश अचानक लोकलकडे झेपावला. लोकलची धडक लागून तो रूळाच्या मधोमध पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने लोकल थांबवून आकाशला लोकलखालून बाहेर काढत प्रथमोपचार दीले. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला दुपारी 12 च्या सुमारास मृत घोषित केले. अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली.