महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सिगारेट ओढत गरबा खेळणाऱ्यांना मनाई केल्याचा वाद; तरुणावर ब्लेडने वार

तीन टवाळखोर तरुण दारू पिऊन सिगारेट ओढत गरबा खेळत होते. त्या टवाळखोर तरुणांना एका तरुणाने अश्या अवस्थेत गरबा खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून (Youth Attack in Garba Thane) त्या टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण (Youth stabbed and beaten Thane) करत त्याच्यावर धारदार ब्लेडने वार केल्याची घटना (Youth stabbed with sharp weapons ) घडली आहे. ही घटना कल्याण नजीक आंबवली गावातील टिप्पना नगर मध्ये घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात (Khadakpada police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Youth Attack in Garba Thane
Youth Attack in Garba Thane

By

Published : Oct 3, 2022, 6:20 PM IST

ठाणे : तीन टवाळखोर तरुण दारू पिऊन सिगारेट ओढत गरबा खेळत होते. त्या टवाळखोर तरुणांना एका तरुणाने अश्या अवस्थेत गरबा खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून (Youth Attack in Garba Thane) त्या टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण (Youth stabbed and beaten Thane) करत त्याच्यावर धारदार ब्लेडने वार केल्याची घटना (Youth stabbed with sharp weapons ) घडली आहे. ही घटना कल्याण नजीक आंबवली गावातील टिप्पना नगर मध्ये घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात (Khadakpada police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश कोंलची (वय २६), विवेक हरिचंद्र (वय २२) विजय शंकर (वय २२) असे गुन्हा दाखल झालेल्या टवाळखोर तरुणांची नावे आहेत. तर अयप्पा अर्जुन (वय २६) असे टवाळखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Thane crime)


दारुड्यांचा गरबा पेन्डालमध्ये हल्ला -नवरात्री उत्सवात ठिकठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात गरबा सुरू आहे. असाच गरबा आंबवली गावातील टिप्पना नगरमधील माता मंदिराच्या पटांगणात सुरू आहे. काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सर्वच गरब्यात मोठ्या प्रमाणात तरुणाईसह अबला वृद्धांनी एकच गर्दी केली होती. त्यातच रात्रीच्या सुमारास माता मंदिरातील देवीच्या आरतीवेळी त्याच भागात राहणारे तीन टवाळखोर तरुण दारूच्या नशेत तर्रर्र होऊन पायात चप्पला घालूनच आरतीत सहभागी झाले. त्यानंतर काही वेळातच गरबा सुरू होताच हे तिन्ही टवाळखोर सिगारेट ओढत गरबा खेळत होते. हे पाहून जखमी अयप्पा याने या तिघांना समजावून सांगत अश्या अवस्थेत गरबा खेळण्यास मनाई केली. याच गोष्टीचा राग येऊन या तिघांनी मिळून अयप्पा गरबा खेळणाऱ्या इतर लोकांसमोरच बेदम मारहाण केली. हे टवाळखोर एवढ्याच थांबले नाही तर त्यांनी अयप्पावर धाददार ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले.

हल्लेखोरांचा शोध सुरु-या घटनेनंतर गरब्याच्या ठिकाणी एकच गोधंळ उडून तरुणी व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तर गंभीर जखमी झालेल्या अयप्पाला काही मित्रांनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला. या घटनेचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक ए. जे. बोराटे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details