ठाणेराज्यभर गणेशोत्सव Ganeshotsav 2022 मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ठाण्यातील Thane प्रादेशिक मनोरुग्णालयात Regional Psychiatric Hospital, ७२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला गणेशोत्सव, आजही ठाण्यातील मनोरुग्ण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. मनोरुग्ण पूर्ण पणे बरे होवोत, या प्रार्थनेसह मनोरुग्ण आणि मनोरुग्णालयात कर्मचारी treating psychiatric patients a psychiatric hospital दरवर्षी मनोभावे गणेशाचे पूजन करत असतात. विशेष म्हणजे या संपूर्ण गणेशोत्सवाची तयारी मनोरुग्ण स्वतः करत Worship and management of Ganapati Bappa असतात.
प्रतिक्रिया देतांना मनोरुग्णालयातील रुग्ण व कर्मचारी
1950 साली सुरवात झालेला मनोरुग्णालयातील हा गणेशोत्सव, आता या रुग्णालयातील 1 हजार रुग्णांसाठी आनंदाची पर्वणी असते. या रुग्णालयाचे प्रशासन गणेशोत्सवा दरम्यान मनोरुग्णांना मनोरंजन मिळावे, त्यांचे मन एकाग्र व्हावे यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. गणेशोत्सव दरम्यान नृत्य शिकवले जाते, अनेक कला शिकवल्या जातात, जादूचे प्रयोग तसेच चित्रपट देखील दाखवले जातात.
या सर्व प्रयत्नामुळे या रुग्णांना घरच्यांची उणीव भासत नाही, असे मनोरुग्णांचे मत आहे. प्रतेक सण याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात . मनोरुग्ण घराची आठवण येऊ नये आणि पूर्ण पणे बरे व्हावेत; यासाठी वेगवगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, असे यावेळी मनोरुग्ण वैद्यकीय अधीक्षक नेताजी मुळीक यांनी सांगितले. मनोरुग्णां मध्ये वेगवेगळ्या कला पाहायला मिळतात. यावेळी मनोरुग्णाकडून गणपती बाप्पाचे सुरेख गाणे देखील सादर करण्यात आले. एकूणच मनोरुग्णालयात भक्तिपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाचे पूजन होत असते.
आरत्या पाठ आयोजन ही जवाबदारीमागील अनेक वर्षांपासून या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या, सर्व आरत्या पाठ झालेल्या आहेत. त्यासोबत या गणेशोत्सवाचे नियोजन देखील अनेक बरे झालेले रुग्ण करत आहेत. त्यामुळे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील मदत होते. या रुग्णालयातील रुग्ण गणेशोत्सवाची विशेष वाट पाहत असतात. कारण या रुग्णालयात गणेशोत्सवाचे दहा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात.
हेही वाचाGaneshotsav 2022 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहकुटूंब घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन