ठाणे -बुधवारी सायंकाळी १९.१० च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र २ वरून एका महिलेने रेल्वे ट्रॅकवर उडी मरली. ती रेल्वे ट्रॅकच्या मधोमध झोपली तेव्हा कल्याणकडे जाणारी स्लो लोकल आल्याने ती दोन्ही रुळाच्या मध्येच झोपून राहिली. हा सर्व प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी आरडोओरड कोली. दरम्यान एका प्रवाशाने पोलीस शिपाई प्रदिप दशरथ रणमाळ यांना या विषयी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ त्या महिलेला लोकल खालून ओढून बाहेर काढले. घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रदिप रणमाळ यांनी तातडीने प्रवाशांकडील बॅटरी आणि मोबाईल टॉर्चच्या उजेडात त्या महिलेचा शोध घेतला. त्यावेळी ती जिवंत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी फलाट क्र ३ च्या बाजुच्या नालीजवळ उतरून एका प्रवाशाच्या मदतीने गाडी खाली शिरून त्या महिलेला बाहेर ओढुन काढले.
महिलेचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न संबधीत महिलेला फलाट क्र ३ वर सुरक्षित नेण्यात आले. तेथे तिला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी गस्तीचे पीलीस निरीक्षक यादव, व्हिजीलन्स, स्टेशन ड्युटी कर्मचारी , पीएसआय पवळ आणि ऑफिस स्टॉफच्या कर्मचाऱ्यानी चोख बंदोबस्त केला. या घटनेमुळे लोकल सुमारे २५ मिनिटे थांबुन होती.
या महिलेकडे विचारपुस कली असता , तिने नीला बाबुराव जाधव असे नाव सांगितले. तिला डायबेटीसमुळे खुप भूक लागते. मात्र, तिला शीळे अन्न खावे लागले. तिची वहिनी रागराग करते, ती नोकरीकरत असल्यामुळे जेवन बनवत नाही, वडील आणि भाऊ व्यसनी आहेत. संबधीत महिला १२ वी सायन्स झाली असून ती सिब्समध्ये नोकरी करत होती. मात्र, घरचे लोक सशंय घेत असल्याने मानसिक तनावाने गैरहजेरीमुळे नोकरी सुटली. तिला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. मात्र, घरचे लोक कंम्प्युटर कोर्ससाठी पैसे देत नसल्याचेही तिने सांगितले.
तिच्यावर मनोरूग्ण असल्याने उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिची चीडचीड होते, घरात भांडणे होतात. घरात आई सोबत झालेल्या भांडनामुळे बहिनीने रागात जीव देते असे बोलल्याने पवई ते भांडुप असे चालत आली. त्यानंतर लोकलने ठाणे गाठले आणि आत्महत्या करण्याच्याल विचाराने ठाण्यातील रेल्वे ट्रॅकवर ती झोपली होती, अशी माहिती तिने दिली. तिची विचारपुस करून तिला नातेवाइकांच्या ताब्यात लोहमार्ग पोलिसांनी दिले.