ठाणे - ठाणे हे तलावाशिवाय दहीहंडी Dahi Handi उत्सव प्रेमींचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला टेंभी नाका दहीहंडीचा इतिहास ( History of Dahi Handi ) लाभला आहे. या साऱ्यापासून प्रेरणा घेत १४५ ओवळा माजिवडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सन १९९९ पासून दहीहंडी आयोजित करण्यास सुरवात केली. या दहीहंडीचे रूपांतर पुढे ‘प्रो गोविंदा दहीहंडी’ मध्ये झाले. सन २०१२ साली जोगेश्वरीच्या जय जवान मंडळाने प्रो गोविंदा दहीहंडीत ९ थर रचत विश्वविक्रम देखील घडवला. देशातल्या प्रमुख दहीहंडी मध्ये संस्कृती प्रतिष्ठानाची Sanskruti Pratishanप्रो गोविंदा ही दहीहंडी गणली जाते. प्रो गोविंदा २०२२ ही एकच तत्व हिंदुत्व या विचारधारेवर धुमधडाक्यात आयोजित करण्यात आले आहे. या दहीहंडीत जय जवान मंडळाचा २०१२ सालचा विक्रम मोडणाऱ्या मंडळाला २१ लाखाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय इतर मंडळांना ११ लाख, ५ लाख, ३ लाख अशी बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहे.
दहीहंडीचा खेळामध्ये समावेशप्रताप सरनाईक यांच्या मागणीमुळे काही दिवसांपूर्वी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेनी घेतला. दहीहंडीला जागतिक पाळतीवर नेण्यासाठी दहीहंडीचा समावेश क्रीडाप्रकारात करण्यात यावा अशीही मागणी त्यांच्याद्वारे करण्यात आली होती. यामुळे गोविंदांना क्रीडापटू म्हणून मान्यता मिळून शासकीय लाभ घेता येतील. प्रत्येक गोविंदाला १० लाखांचा विमा कवच देण्याचा निर्णय देखील सरकारने नुकताच घेतला आहे. गोविंदाच्या मागे शिवसेना भाजप सरकार ठामपणे उभे आहे.