महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवी मुंबई महापालिका निवडणूक २०२० : प्रभाग रचनेचे प्रारूप आणि आरक्षणाची सोडत जाहीर - प्रभाग रचना जाहीर

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी होणाऱ्या वर्षात होणाऱ्या निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. यावेळी नवी मुंबई महापालिका शाळेतील मुलांच्या हस्ते चिठ्ठी पद्धतीने आरक्षण काढण्यात आले.

Navi Mumbai Municipal Election 2020
नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी आरक्षणाची सोडत जाहीर

By

Published : Feb 1, 2020, 11:32 PM IST

ठाणे (नवी मुंबई) - येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत तसेच प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले. शनिवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात ही सोडत जाहीर करण्यात आली.

नवी मुंबई महापालिका निवडणूक २०२० साठी प्रभाग रचनेचे प्रारूप आणि आरक्षणाची सोडत जाहीर

अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याबाबतची सोडत जाहीर करण्यात आली. तसेच, प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले. हा कार्यक्रम नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या उपस्थितीत शनिवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात घेण्यात आला. या आरक्षण सोडतमध्ये काही प्रभागात राखीव जागेवर महिला आरक्षण आले. तर, काही प्रभाग मागास महिलांसाठी राखीव झाले. त्यामुळे काहींनी पुर्व अंदाजाने वर्षभरापासून केलेली मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा... केंद्रीय अर्थसंकल्प 2020: 'अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली'

एकंदरीत या सोडतीचा नवी मुंबई महापालिकेत नगरसेवक पद भूषविणाऱ्या दिग्ग्ज नगरसेवकांना चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. बदलेल्या प्रभाग आरक्षण रचनेमुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षांसमोर नवीन प्रश्न निर्माण झाला. काहींना अपेक्षित आरक्षण आल्याने पुन्हा एकदा नव्या दमाने लढण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शनिवारी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आणि अनेक विद्यमान नगरसेवक व इच्छुकांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा... इतिहासातील सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण; पण तब्येत बिघडल्याने राहिले अपूर्ण

नवी मुंबई महापालिकेच्या आगामी होणाऱ्या वर्षात होणाऱ्या निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. यावेळी नवी मुंबई महापालिका शाळेतील मुलांच्या हस्ते चिठ्ठी पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. सर्वच नगरसेवकांचे पुढील राजकीय भवितव्य या सोडतीवर निश्चित होणार होते. त्यामुळे मोठी गर्दी होईल, अशी शक्यता गृहीत धरून पालिकेने त्या दृष्टीने तयारी केली होती. मात्र काही ठराविक नगरसेवकांचा अपवाद वगळता असंख्य नगरसेवकांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याचे दिसून आले. तसेच बड्या नेत्यांनी याकडे पाठ फिरवली.

तसेच समर्थकांसह आलेल्या काही विद्यमान नगरसेवकांचा भ्रमनिरास झाला. काहींनी सभागृहातूनच काढता पाय घेतला. बदललेल्या आरक्षणाचा विद्यमान बहुतांश नगरसेवकांना फटका बसला. यात प्रामुख्याने नवी मुंबईचे विद्यमान महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृह नेते अनंत सुतार, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी उपमहापौर अशोक गावडे, शिवसेना गटनेते द्वारकानाथ भोईर, स्थायी समिती सभापती नवीन गवते, माजी उपमहापौर अविनाश लाड, नगरसेवक किशोर पाटकर, नगरसेविका पूनम पाटील, विशाल डोळस आदींचा समावेश आहे. तर नगरसेवक जगदीश गवते, प्रशांत पाटील, विनया मढवी, हेमांगिनी सोनावणे आदींच्या प्रभाग आरक्षणात बदल झाल्याने एकप्रकारे त्यांनाही धक्का बसला आहे . तर नगरसेविका सायली शिंदे, उज्वला झंझाड, स्वप्ना गावडे, वैशालीं नाईक, निर्मला कचरे , सोमनाथ वास्कर, मिरा पाटील, व नेत्रा शिर्के आदी विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली आहे.

हेही वाचा... 'भारताच्या अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यात अपयशी ठरणारा अर्थसंकल्प'

सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी आहे. हरकती व सूचना प्रामुख्याने महापालिका आयुक्त यांच्याकडे, निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालय येथे दुपारी ३ वाजेपर्यंत सादर कराव्यात. त्यानंतर या प्राप्त झालेल्या हरकती व सूचनाचे विवरण पत्र राज्य निवडणूक आयोगाकडे बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहेत. तसेच हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी करता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, असे महापालिकेतर्फे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा... कुणाल कामराची 'इंडिगो'ला नोटीस, मागितली 25 लाखांची नुकसानभरपाई

साधारणत: एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धत शासनाने रद्द केल्यामुळे आधी जाहीर करण्यात आलेली आरक्षणाची सोडत रद्द करण्यात आली. तेव्हा एकसदस्यीय पद्धतीनेच निवडणूक होणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका लोकप्रतिनिधींची संख्या २०१५ च्या निवडणुकीप्रमाणेच १११ इतकी राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details