कल्याणमध्ये गणेश विसर्जनादरम्यान कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू - Volunteer has died due to electric shock
कल्याण पश्चिमेकडील बेतूरकर पाडा परिसरात गणेश विसर्जनासाठी गणेश मूर्ती विसर्जनासाठी लाईट तपासण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू झाला. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
kalyan
ठाणे - गणेश विसर्जनासाठी गणेश मूर्ती मंडपाबाहेर काढताना विजेचा जोरदार झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कल्याण पश्चिमेकडील एव्हरेस्ट नगर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. प्रशांत चव्हाण ( वय 28) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.