ठाणे - भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात २६ जून रोजी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीसह अन्य भागात हे आंदोलन कशा प्रकारे केले जाईल, यासाठी भाजपकडून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे कार्यकर्त्यांना चक्का जाम कसे आंदोलन करायचे हे सांगत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने, पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
टायर घेऊन या अन् चक्काजाम करा, भाजप आमदाराच्या विधानाने खळबळ - BJP MLA Dombivali
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात २६ जून रोजी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन कशा प्रकारे केले जाईल, याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
लपून-छपून टायर घेऊन या अन् चक्काजाम करा. टायर कशासाठी आणला जातो हे सांगण्याची गरज नाही. चक्का जाम करण्यासाठी त्याचा वापर करा, असे आमदार चव्हाण कार्यकर्त्यांना सांगत आहेत. (२६ जून)रोजी भाजपने राज्यभर आंदोलनाची तयारी केली आहे. याबाबतचा आमदार चव्हाण यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होते आहे. या व्हिडीओमध्ये आंदेलन कसे करायचे हे सांगताना दिसून येत आहे. सरकारचे या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी उग्र आंदोलन करण्याचेही यामध्ये सांगितले जात आहेत. ठाणे जिल्ह्यात रस्त्यावर टायर जाळून कुठे-कुठे आंदोलन करण्यात येणार आहे, याचा तपास आता पोलिसांनी सुरु केला आहे. तर, आमदाराच्या या विधानानंतर पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.