ठाणे -शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवारांवर एका कार्यक्रमात वक्त्यव्य करून नव्या वादाला तोंड फोडले. मात्र अनंत गीते यांनी केलेल्या आरोपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांची बाजू घेत अनंत गीते यांनी शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलाय, मात्र १९९८ मध्ये शरद पवार यांना काँग्रेसमधून काढलं होतं. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही तर, काँग्रेसने शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे असे आरोप करणे योग्य नसल्याचे सांगत गीते-पवारांच्या वादावर राजकीय पडदा टाकल्याचे पाहवयास मिळाले आहे. रामदास आठवले कल्याणात आले होते. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर पत्रकारांशी बोलत होते.
खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सव्वा रुपयांच्या मानहाणीचा दावा करणार त्यांची तेवढीच किंमत असल्याची टीका केली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना त्यांनी सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी, असे म्हणत संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नक्कीच नाही, असा टोमणा मारला. राज्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाबाबत बोलताना रामदास आठवले यांनी सध्या उलट सुलट आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. संजय राऊत सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते, नेते आहेत. त्यांना अशा प्रकारचे आरोप करत वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाही, असा सल्ला आठवले यांनी राऊत यांना दिला आहे.