महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर भटकणाऱ्या दुचाकी चालकाने महिला सफाई कर्मचाऱ्याला दिली धडक - two wheeler accident

ठाणे महापालिकेच्या एका कंत्राटी सफाई कर्मचारी महिलेला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. ज्यामधे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच अपघातानंतर दुचाकी चालक तेथून फरार झाला आहे.

two-wheeler-accident-during-lockdown-in-thane
दुचाकी चालकाने महिला सफाई कर्मचाऱ्याला दिली धडक

By

Published : Apr 12, 2020, 4:04 PM IST

ठाणे - महापालिकेच्या एका कंत्राटी सफाई कर्मचारी महिलेला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. ज्यामधे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. ठाण्याच्या पोखरण क्रमांक 2च्या रस्त्यावर दररोजप्रमाणे महिला कर्मचारी संगीता पोफळकर या रस्तेसफाईचे काम करत होत्या. मात्र, तेव्हा लॉकडाउन असतानाही एक युवक अतिवेगाने मोटर सायकलवर आला आणि त्याने सफाई कर्मचारी संगीता पोफळकर यांना जोराची धडक दिली.

लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर भटकणाऱ्या दुचाकी चालकाने महिला सफाई कर्मचाऱ्याला दिली धडक

हेही वाचा....सवाल पोटाचा! सायकलने 1800 कि.मी प्रवास करून त्याने गाठले घर

दुचाकीस्वारने दिलेली धडक एवढी जोरदार होती की, मोटरसायकलची नंबर प्लेट तुटुन खाली पडली. याबाबत जखमी महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार मोटरसायकलचा क्रमांक (एम.एच. 04 ई.आर. 9254) हा आहे. तसेच या मोटरसायकल चालकाने सदर महिलेला धडक दिल्यानंतर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या अन्य महिलेस देखील धक्काबुक्की केल्याचे संगीताल पोफळकर यांच्यासोबत असणाऱ्या सहकारी महिलेनी सांगितले. संगीता यांना डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना ठाण्याच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details