महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात दोन मोबाईल चोरट्यांना अटक..... सीसीटीव्ही फुटेज आले समोर - CCTV footage came to light

ठाणे न्यायालयात वकिली करणारे या घटनेतील फिर्यादी 22 जुलै 2021 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथून पायी जात होते. त्याचवेळी बाईकवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी वकिलांच्या हातातील 24 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. आणि हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. याप्रकरणी सदर वकिलांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

thane
thane

By

Published : Aug 3, 2021, 10:21 AM IST

ठाणे -ठाण्यातील एका वकीलाच्या मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या दोघा मोबाईल चोरट्यांना सीसीव्हीचा आधार घेत ठाणेनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सागर यादव आणि हेमंत थानवी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या चोरट्यांकडून दोन दुचाकी आणि 16 मोबाईल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोघा मोबाईल चोरट्यांना अटक

ठाणे न्यायालयात वकिली करणारे या घटनेतील फिर्यादी 22 जुलै 2021 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथून पायी जात होते. त्याचवेळी बाईकवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी वकिलांच्या हातातील 24 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. आणि हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. याप्रकरणी सदर वकिलांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सीसीटीव्ही फुटेज

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या पथकाने भिवंडीतून सागर आणि हेमंत या दोघांना 23 जुलै रोजी अटक केली. या दोघा आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2, नौपाडा पोलीस ठाणे हद्दीत 3 तर राबोडीत 1 असे 6 मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी आणि चोरीतील 16 मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्यांची किंमत 4 लाख 10 हजार रुपये इतकी आहे. तसेच हे दोन्ही आरोपी आपल्या पालकांना स्वीगी मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणुन काम करत असल्याचे सांगत दुचाकीने मोबाईल चोरी करत असल्याची अधिक माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details