महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मेफेड्रोनच्या विक्रीसाठी आलेल्या दोन व्यक्तींना केली अटक - mira bhayandar crime news

दोन आरोपींना अटक केली असून एन. डी. पी. एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे
ठाणे

By

Published : Dec 16, 2020, 3:10 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) -दहिसर नाक्यावरून एक मोटार सायकलवरून दोन इसम जात असताना गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना दिसून आले. तपासणी केली असता ३५० ग्रॅम सफेद तपकिरी रंगाचे एम. डी. आढळून आले. सदर दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे.

दोन व्यक्तींना अटक

सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गुन्हे शाखा मध्यवर्ती युनिटचे पोलीस अंमलदार मते आणि पाटील व केंद्रे असे दहिसर नाक्यावरून येत असताना त्यांना हायवेवरून डेल्टा गार्डनकडे जाणाऱ्या नाक्यावर एक संशयित मोटारसायकलवरून दोन व्यक्ती जाताना मिळून आले. पोलिसांनी अंगझडती केली असता अमली पदार्थ मिळून आले. ३५० ग्रॅम एम. डी. आढळून आला आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक केली असून एन. डी. पी. एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमली पदार्थांची विक्रीत वाढ

दिवसेंदिवस अमली पदार्थांची विक्रीमध्ये वाढ होताना दिसतआहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांसह अनेक व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. मीरा भाईंदर शहरातील अनेक ठिकाणी अमली पदार्थांची विक्री जोरदार सुरू आहे. काशीमीरा, मुन्सी कंपाउंड, नया नगर, भाईंदर पश्चिममधील आंबेडकर नगरमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details