ठाणे - शहरात वाढणाऱ्या घरफोड्या व वाहनचोऱ्यांना आळा घालण्यासाठी ठाणे आयुक्तालय क्षेत्रात मोठी नाकाबंदी केली गेली होती. संशयित आरोपी व संशयित गाड्यांची कसून चौकशी करत असतानाच कळवा पोलिसांच्या जाळ्यात अट्टल गुन्हेगारांच्या दोन टोळ्या अडकल्या. यामधील एक टोळी घरफोड्या करणारी, तर दुसरी गाड्या चोरणारी आहे.
घरफोडी करणाऱ्या दोन जणांच्या टोळीची चौकशी केली असता, एकूण 13 घरफोड्यांची उकल झाली. पोलिसांनी या दोघांकडून एकूण 35 तोळे सोने, दहा हजार रोख आणि चार मोबाईल जप्त केले. एकूण १६ लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. बंद घरांना हेरून हे टोळके तिथे घरफोड्या करून सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान सामान चोरत असत.