ठाणे - कल्याणजवळ असलेल्या शहाड रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना एक्सप्रेसची धडक लागल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, दुसऱया एका घटनेत २ दिवसांपूर्वी उध्दव कसरा या प्रवाशाचा रूळ ओलांडताना याठिकाणीच लोकलच्या धडकेत मृत्यू झाला होता.
शहाड रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मुत्यू - शहाड
शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे पादचारी पुल असताना देखील काही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रूळ ओलांडतात. गेल्या ४ दिवसात शहाड रेल्वे स्थानकात दोघांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात रेल्वे गाडीने धडक दिल्याने उध्दव कसरा (वय २७, राहणार उल्हासनगर) अपघाती मुत्यू झाला. तर, सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाराणसी एक्सप्रेसने धडक दिल्याने गिरिष मेघराज कोटवानी (वय ३९, राहणार उल्हासनगर) यांचा दुर्दैवी मुत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मुत्यूची नोंद केली आहे.
शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे पादचारी पुल असताना देखील काही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रूळ ओलांडतात. गेल्या ४ दिवसात शहाड रेल्वे स्थानकात दोघांचा मृत्यू झाला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यावर रेल्वे पोलिसांनी, आरपीएफ यांनी कारवाई करणे गरजेचे आहे. शहाड रेल्वे स्थानकावर सुरक्षा नसल्यामुळे दिवसाढवळ्या मोबाईल चोरांचा सुळसुळाट आणि वावर असतो. रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून एक कायमस्वरूपी स्टेशन मास्तर शहाड स्टेशनला द्यावा, अशी मागणी कल्याण कसारा वेल्फेअरचे महासचिव निलेश देशमुख यांच्यावतीने करण्यात आली आहे.