ठाणे - ठाण्याच्या इस्टर्न एक्सप्रेस रोडवरील नाशिक मार्गावर शुक्रवारी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटला. त्या उलटलेल्या ट्रकमधील २० टन टोमॅटो रस्त्यावर पडल्याने रस्ता लाल भडक झाला होता. ट्रक आणि टोमॅटोच्या खचामुळे मुंबई आणि नाशिक या मार्ग साधारण चार ते पाच तास वाहतूक खोळंबली होती.
ठाण्यात La Tomatina festival, टोमॅटोचा ट्रक उलटल्याने रस्ता झाला "लाल भडक" - ठाणे ट्रक अपघात
वाहतूक कोंडी झाल्यामुळे महामार्गावर फक्त एकाच बाजूने वाहतूक चालू होती. दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांब रांगा होत्या. अथक प्रयत्नानंतर वाहतूक पोलीस ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने ट्रक आणि टोमॅटो रस्त्यावरून एका जेसीबीच्या सहाय्याने बाजूला केला.
टोमॅटो ट्रकचा अपघात
वाहतूक कोंडी झाल्यामुळे महामार्गावर फक्त एकाच बाजूने वाहतूक चालू होती. दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांब रांगा होत्या. अथक प्रयत्नानंतर वाहतूक पोलीस ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने ट्रक आणि टोमॅटो रस्त्यावरून एका जेसीबीच्या सहाय्याने बाजूला केला. त्यानंतर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.
Last Updated : Jul 16, 2021, 3:04 PM IST