ठाणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याासाठी 'शहर बंद' चे आवाहन करण्यात आले. मात्र, अने ठिकाणी रिक्षाचालकांनी शेअर रिक्षा चालू ठेवल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. काही ठिकाणी वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालकांमध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाचीही झाली.
ठाण्यात शेअर रिक्षा चालूच; वाहतूक पोलिसांची कारवाई - thane transport news
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याासाठी 'शहर बंद' चे आवाहन करण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी रिक्षाचालकांनी शेअर रिक्षा चालू ठेवल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
अनेक ठिकाणी रिक्षाचालकांनी शेअर रिक्षा चालू ठेवल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
प्रशासनाकडून रस्त्यावर न फिरण्याचे आवाहन केले असतानाही शहरात शेअर रिक्षा चालूच आहेत. यामुळेच वाहतूक पोलिसांनी या मुजोरीविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्यांच्याकडून दंड आकारण्यात येत आहे.
अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला बंद होणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी भाज्या घेण्यास गर्दी करू नये, असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.