ठाणे -कारच्या पाठीमागील चाकाजवळ पैसे पडले आहेत, अशी थाप मारून दोन भामट्यांनी गाडीच्या सीटवरील लेदर बॅगसह लायसन्सधारी पिस्तूल व रोख रक्कम पळवली. ही घटना उल्हासनगरातील शिवाजी चौक परिसरातील ए-१ स्वीट दुकानासमोर घडली. या प्रकरणी उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात २ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रवींद्र कराळे असे कार मालकाचे नाव आहे.
कारच्या मागे पैसे पडल्याची थाप मारून भामट्यांनी रिव्हॉलरसह रोकड पळविली हेही वाचा -लग्नाचे आमिष दाखवून विवाहीत प्रियकराचा तरुणीवर अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र कराळे हे बदलापूर पश्चिम परिसरात राहतात. ते दुपारच्या सुमाराला उल्हासनगरातील कॅम्प नं.३ येथे त्यांच्या कारने आले होते. त्यावेळी शिवाजी चौकाजवळील ए-१ स्वीट दुकानासमोर ते कारजवळ उभे असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना तुमच्या गाडीच्या पाठीमागील चाकाजवळ पैसे पडले आहेत, असे बोलून त्यांचे लक्ष विचलीत केले. त्याचवेळी दुसऱ्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गाडीच्या पुढच्या शिटवर ठेवलेली लेदर बॅग व त्यामधील वस्तू गाडीचा दरवाजा उघडून सीटवरून चोरल्या.
हेही वाचा -कचऱ्याच्या डंपरचे ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात २ मजूर ठार तर सहाजण गंभीर जखमी
लेदर बॅगमध्ये १ लायसन्सधारी रिव्हॉलर, ६ लोडेड राऊंड, रिव्हॉलर लायसन्स, बँकेचे डेबीट कार्ड, चेकबुक, पॅनकार्ड, आधार कार्ड, रोख रक्कम व आदी वस्तू होत्या. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.