ठाणे- राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नविन प्रभाग रचना करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवर कोपरी येथील रहिवाशांनी हरकत उपस्थित केला असून केवळ राजकीय फायद्यासाठी कोपरीचे तुकडे करू पाहणाऱ्यांना कोपरीकर त्यांना त्यांची जागा देखवेल, असा इशाराही कोपरीकरांनी दिला आहे.
नव्या प्रभाग रचनेनुसार कोपरीचे तीन तुकडे करण्यात आले असून ठाणे पूर्व कडील आनंद नगर, गांधी नगरचा भाग वागळे इस्टेट प्रभाग समितीला जोडला गेला असून कोळीवाड्याचा भाग नौपाडा प्रभाग समितीला जोडला जाणार आहे. यामुळे कोपरी प्रभाग समितीचे अस्तित्त्व धोक्यात येण्याची शक्यता कोपरीकरांकडून व्यक्त केली जात आहे. ठाणे महापालिकेतील प्रभाग रचने प्रमाणे कोपरी प्रभाग समिती अस्तित्वात आली. विकास व प्रभागाचा विस्तार यानुसार नगरसेवकांची संख्या वाढणे गरजेचे होते. मात्र, पूर्वी 9 नगरसेवकांची संख्या असलेल्या प्रभाग समिती केवळ चार नगरसेवकांवर मर्यादीत झाली होती. मात्रा, कोपरी प्रभाग समिती नष्टच होणार आहे. हे सर्व केवळ राजकीय फायद्यासाठी चालले आहे. मात्र, यामुळे कोपरीचा विकास मंदावत जाणार असून कोपरी प्रभाग समिती पूर्वीप्रमाणे करावी, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.