महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 28, 2021, 6:52 AM IST

Updated : Aug 30, 2021, 12:41 PM IST

ETV Bharat / city

सासरच्या जाचाला कंटाळून या महिलेने केली आत्महत्या, त्यापूर्वी हा VIDEO रेकॉर्ड करुन मांडली कैफियत

प्रतिभा हिला ठाण्यात माहेरचे कोणीच जवळ नव्हते, याचाच फायदा घेत सासरच्या लोक तिला मानसिक त्रास देत असल्याचे तिने तिच्या जवळच्या मैत्रिणींना सांगितले होते. मात्र आता त्रास असह्य झाल्याने प्रतिभा जयस्वाल हिने आपल्याला होणार त्रास व्हिडिओद्वारे मैत्रिणींपर्यंत पोहोचवला आणि आत्महत्या केली.

http://10.10.50.85//maharashtra/27-August-2021/attachedvideopics_27082021202724_2708f_1630076244_224.jpg
http://10.10.50.85//maharashtra/27-August-2021/attachedvideopics_27082021202724_2708f_1630076244_224.jpg

ठाणे- शहरातील वर्तक नगर भागात राहणाऱ्या एका पीडित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मरण्यापूर्वी तिने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची कहाणी सांगणारा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्याला मैत्रिणींना पाठवला होता. प्रतिभा जयस्वाल असे मृत पीडितेचे नाव होते. तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी परस्पर येऊन अंत्यविधी उरकला आणि तिच्या सासरच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने संपवले जीवन

ठाण्याच्या वर्तक नगर परिसरात प्रतिभा जयस्वाल 32 वय असलेल्या महिलेचा 11 वर्षा पूर्वी विवाह झाला होता. मूळची उत्तरप्रदेश मधील असलेल्या प्रतिभा हिला ठाण्यात माहेरचे कोणीच जवळ नव्हते, याचाच फायदा घेत सासरच्या लोक तिला मानसिक त्रास देत असल्याचे तिने तिच्या जवळच्या मैत्रिणींना सांगितले होते. मात्र आता त्रास असह्य झाल्याने प्रतिभा जयस्वाल हिने आपल्याला होणार त्रास व्हिडिओद्वारे मैत्रिणींपर्यंत पोहोचवला आणि आत्महत्या केली.

आत्महत्येबद्दल आई वडिलांची मागितली माफी-

या व्हिडिओ संदेशात पीडित महिलेने नवरा कसा आपल्याकडे दुर्लक्ष करतो आणि आजारी असताना देखील डॉक्टरकडे न नेता मेलीस तरी चालेल, असे सुनावत असल्याचे सांगितले आहे. सासरचे आपल्याला खर्चासाठी एक छदाम देत नाहीत. त्यामुळे आपण एक एक पैसे जोडून शिलाई मशीन घेतली, तर तिचा वापर करण्यास आपल्याला मज्जाव केल्याचे पीडितेने चक्क रडत रडत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. दरम्यान आपण उचलत असलेल्या टोकाच्या पाऊलाबद्दल स्वतःच्या आईवडिलांची तिने माफी देखील यावेळी मागितली आहे. तिच्या या आत्महत्या करण्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या होण्याऱ्या अत्याचाराला आणि मानसिक त्रासाला ती कंटाळली होती, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने संपवले जीवन,


दरम्यान शुक्रवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जयस्वाल कुटूंबात अंतर्गत वाद होते, या प्रकरणी आकस्मिक मृत्यची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे यावेळी वर्तक नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले.

Last Updated : Aug 30, 2021, 12:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details