महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल, रवी पुजारीच्या नावाचाही समावेश - ठाणे पोलीस स्टेशन

तक्रारदार केतन तन्ना, सोनू जालान आणि रियाज भाटी या तिघांनी परमबीरसिंग आणि त्यांचे २७ सहकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ठाणे नगर पोलिसांनी गुरुवारी सोनू जालान यांचा जबाब नोंदविला होता. तर शुक्रवारी केतन तन्ना आणि रियाज भाटी यांचा जबाब नोंदवून अखेर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल
परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल

By

Published : Jul 31, 2021, 6:57 AM IST

Updated : Jul 31, 2021, 9:19 AM IST

ठाणे -खोट्या केसमध्ये अडकवून कोट्यवधींची खंडणी वसुली प्रकरणी अखेर ठाणे नगर पोलीस ठाण्यात तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर यांच्यासह एकूण 28 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि ठाण्यातील एका समाजसेवकाचाही समावेश आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे परमबीर सिंग यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. परमबीरसिंह यांच्या विरोधात पाच प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.

तक्रारदार केतन तन्ना, सोनू जालान आणि रियाज भाटी या तिघांनी परमबीरसिंग आणि त्यांचे २७ सहकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ठाणे नगर पोलिसांनी गुरुवारी सोनू जालान यांचा जबाब नोंदविला होता. तर शुक्रवारी केतन तन्ना आणि रियाज भाटी यांचा जबाब नोंदवून अखेर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल
तत्कालीन पोलीस आयुक्तांसह २८ जणांचा गुन्ह्यात समावेशठाणे नगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री दाखल झालेल्या गुन्ह्यात तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, दीपक देवराज, एन. टी. कदम, चकमक फेम प्रदीप शर्मा, ठाणे खंडणी विरोधी पथकाचे माजी वरिष्ठ राजकुमार कोथीमिरे, स.पो.उप.नि. मोरे, पोलीस कर्मचारी चौधरी, विकास दाभाडे, रितेश शहा, दिपल अग्रवाल, रवी पुजारी, संजय पुंनमिया, अनिल सिंग, बच्ची सिंग, जुबेर मुजावर, सुनील देसाई, मनीष शहा उर्फ चोटी , किशोर अग्रवाल, बरखा अग्रवाल, समाजसेवक बिनु वर्गीस, तारीख परवीन, देवा भानुशाली, अंकित भानुशाली, विशाल कारिया , प्रदीप सोदानी, प्रशांत कोठारी, दीपक कपूर, नागेश यांचा समावेश आहे.गुन्ह्यात आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारीगुन्हा दाखल झालेल्या पैकी आठ जण हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नावाचा समावेश आहे. तर दुसरीकडे खंडणी खोर रवी पुजारी याच्या नावाचा समावेश आहे. परमबीर सिंग आणि इतर जणांवर जबरी चोरी, धमकावणे, खंडणी सारखे दहाहून अधिक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथीमिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम, तसेच दोन पोलीस शिपाईचा समावेश आहे. माजी ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर ठाणे आयुक्तालयात दोन गुन्हे आणि मुंबई पोलीस आयुक्तालयातील हद्दीत एक असे तीन गुन्हे दाखल झालेले आहेत.

रवी पुजारी आरोपी
या खंडणी प्रकरणामध्ये 28 आरोपींमध्ये रवी पुजारी हा सुद्धा एक आरोपी आहे याचा अर्थ पोलिसांनी आणि परमबीर सिंग यांनी रवी पुजारी यांच्या नावाचा वापर करत अनेक लोकांकडून खंडणी वसूल केलेली आहे, असा आरोप यावेळी केतन यांनी केला आहे.

100 कोटी वसुलीचा माजी गृहमंत्र्यांवर आरोप केला होता

मार्च महिन्यात मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली होमगार्डच्या पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्याच्या गृहविभागाच्या कारभारवर बोट ठेवत तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर100 कोटी रुपये वसुलीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर मात्र परमबीर यांच्याविरोधातही तक्रारी समोर येऊ लागल्या आणि 5 प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.

Last Updated : Jul 31, 2021, 9:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details