ठाणे- हल्लीच्या धकाधकीच्या काळात समाजामध्ये वावरण्याचे प्रमाण कमी झाल्याने अनेकांना लग्नासाठी आपल्या पसंतीची मुलगी किंवा मुलगा शोधणे कठीण झाले आहे. यामुळे अनेक जण मॅट्रिमोनिअल साइट्स ( Matrimonial Sites ) आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा शोध घेतात. याचाच गैरफायदा घेत तब्बल 41 महिलांची फसवणूक ( Matrimonial Sites Fraud ) करून कोट्यवधी रुपये उकळून काही महिलांचा बलात्कार करणाऱ्यास ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रजित जोगीश केजे ( वय 44 वर्षे, रा. पुदुच्चेरी ), असे लखोबाचे नाव आहे. त्याचा मित्र श्रीनिवासलाही अटक करण्यात आली आहे.
याबाबत सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुण्यात एका महिलेने मॅट्रिमोनिअल साइटवर ओळख झालेल्या व्यक्तीने 17 लाख रुपयांची फसवणूक करुन लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणातील आरोपी ठाणे येथे येणार असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रजित यास 11 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आतापर्यंत 41 महिलांची फसवणूक केली असून तब्बल 3 कोटी 28 लाख रुपये लुबाडल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी काही रक्कम तो त्याचा मित्र श्रीनिवास याच्या खात्यावर टाकत होता. यामुळे 19 डिसेंबर रोजी श्रीनिवास यास हैदराबाद येथून अटक करण्यात आली.
असे दाखवत होता आमिष
एखादी विधवा किंवा घटस्फोटीत महिलेला तो लग्नाचे आमिष दाखवत होता. जर अपत्य असेल तर तेही माझी जबाबदारी आहे, असे सांगत होता. मला सावत्र आई होती त्यामुळे मला कधीच प्रेम मिळाले नाही, मी एकटाच आहे, असे भावनिक संभाषण करून तो मुली-महिलांना फसवायचा. भावनेशी खेळत महिलांना जाळ्यात ओढायचा त्यानंतर विविध कारणे सांगत त्यांच्याकडून पैसे उकळायचा व लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करायचा.
दुप्पट व्याजाचे आमिष दाखवून अनेकांना लुबाडलं