ठाणे- विषारी सापासोबत २१ वर्षीय तरुण खेळ करत असतानाच त्या सापाने तरुणाच्या गुप्तांगाला दंश केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील ( Bhiwandi city ) कोंबडपाडा परिसरात असलेल्या गावदेवी मंदिरात घडली आहे. शिवा हाटेकर ( वय- २१) असे विषारी सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Thane: विषारी सापासोबत खेळ बेतला जीवावर; सापाने गुप्तांगाला दंश केल्याने तरुणाचा मृत्यू
विषारी सापासोबत २१ वर्षीय तरुण खेळ करत असतानाच त्या सापाने तरुणाच्या गुप्तांगाला दंश केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील ( Bhiwandi city ) कोंबडपाडा परिसरात असलेल्या गावदेवी मंदिरात घडली आहे. शिवा हाटेकर ( वय- २१) असे विषारी सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मद्यधूंद अवस्थेत विषारी सापासोबत खेळ...
मृत शिवा हाटेकर हा तरुण भिवंडीतील कोंबडपाडा भागात कुटूंबासह राहत होता. तो रविवारी रात्रीच्या सुमारास मद्यधूंद अवस्थेत परिसरातील गावदेवी मंदिरात गेला होता. त्यावेळी त्याला मंदिरात विषारी साप दिसला असता त्याने सापाला दारूच्या नशेत पकडले. त्यानंतर तो पकडलेल्या विषारी सापासोबत खेळू करू लागला. दरम्यान खेळ करत असतानाच चवताळलेल्या सापाने त्याला गुप्तांगाला दोन वेळा दंश केल्याने शिवाला उपचारासाठी सुरवातीला भिवंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती अधिकच खलावल्याने त्याला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने तो राहत असलेल्या परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा-7 प्रवाशांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरचे समुद्रात आपत्कालीन लँडिंग