महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

टीडीआरएफच्या जवानांना पूर परिस्थितीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण, ठाणे मनपाचा उपक्रम

आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रणासाठी उप कमांडंट अरुण राऊत यांच्या नेतृत्वाखाली टीडीआरएफच्या ४० जवानांची सक्षम टीम तयार करण्यात आली आहे. या टीमच्या साहाय्याने शहरात आपत्तीजन्य परिस्थितीत नियंत्रण ठेवण्याचे काम सातत्याने सुरु आहे.

By

Published : Aug 3, 2019, 8:02 AM IST

Updated : Aug 3, 2019, 8:23 AM IST

ठाणे महापालिकेच्यावतीने टीडीआरएफच्या जवानांना पूर परिस्थितीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण

ठाणे - आपत्तीजन्य परस्थीतीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने 'टीडीआरएफ' च्या ३० जवानांचा गट तयार करण्यात आला आहे. या जवानांच्या टीमला नागरी संरक्षण दलाच्यावतीने मासुंदा तलावात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी त्यांना पूरजन्य परस्थीतीत बोट चालवण्याचे आणी पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.

ठाणे महापालिकेच्यावतीने टीडीआरएफच्या जवानांना पूर परिस्थितीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण

आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रणासाठी उप कमांडंट अरुण राऊत यांच्या नेतृत्वाखाली टीडीआरएफच्या ४० जवानांची सक्षम टीम तयार करण्यात आली आहे. या टीमच्या साहाय्याने शहरात आपत्तीजन्य परिस्थितीत नियंत्रण ठेवण्याचे काम सातत्याने सुरु आहे. मागच्या आठवड्यात महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात ठाणे महापालिकेच्या टीडीआरएफच्या जवानांचा मोलाचा वाटा आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने या सर्व जवानांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येत आहे. शुक्रवारीत्यांना मासुंदा तलावात नागरी संरक्षण दलामार्फत पूरजन्य परस्थितीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

Last Updated : Aug 3, 2019, 8:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details