ठाणे - गुरुवारी दुपारी अडीचच्या दरम्यान ठाणे परिवहन सेवेची नादुरुस्त बस रस्त्यावर धावत होती. बसचा अचानक एअरब्रेक न लागल्याने टीमटी चालकाने लोकमान्यनगर येथे एका भिंतीला धडक देत बस थांबवली. यामध्ये २ दुचाकी आणि रिक्षाचे नुकसान झाले. चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबविण्याचा निर्णय घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ठाणे महापालिकेच्या बसची भिंतीला धडक, चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली - ठाणे
बसचा अचानक एअरब्रेक न लागल्याने टीमटी चालकाने लोकमान्यनगर येथे एका भिंतीला धडक देत बस थांबवली.
परिवहन सेवेच्या अनेक बसेस विविध बस डेपो मध्ये धूळखात पडल्याची अवस्था आहे. अशातच नादुरुस्त बस (क्रमांक एम एच ०४ जि ८११४) रस्त्यावर धावत होती. चालक खानविलकर हे नेहमीप्रमाणे ठरलेल्या मार्गावरुन बस चालवत होते. वागळे बस डेपो जवळील लोकमान्य नगर येथे बस आली होती. चालकाने बस थांबवण्यासाठी एअरब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, एअरब्रेक लागला नाही.
त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत बसची दिशा बदलली. चालकाने शेजारील भिंतीच्या दिशेने बस वळवून भिंतीला धडक देत बस थांबवली. या अपघातात भिंतीजवळ असलेल्या २ दुचाकी तसेच रिक्षाचे नुकसान झाले. नादुरुस्त बस रस्त्यावर धावत होती. यामुळे ठाणे महापालिकेच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.