महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात 'थुंकू नका आणि थुंकू देऊ नका' या विशेष मोहीमेचा प्रारंभ - do not spit

थुंकण्यामुळे पसरणारे जंतू आणि त्याचा आरोग्यावर होणारा विपरित परिणाम टाळण्यासाठी शहरात मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास १२०० रिक्षाचालक सहभागी झाले होते.

थुंकू नका आणि थुंकू देऊ नका' मोहिम

By

Published : May 4, 2019, 9:16 PM IST

ठाणे- महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, गुन्हे शाखा आणि शहरातील काही डॉक्टरांच्या पुढाकाराने सार्वजनिक ठिकाणी 'थुंकू नका आणि थुंकू देऊ नका' ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शहरात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचा शुभारंभ ४ मे २०१९ ला डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे पार पडला.

थुंकू नका आणि थुंकू देऊ नका' मोहिमेचा प्रचार

ठाणे शहरात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास १२०० रिक्षाचालक सहभागी झाले होते. यावेळी रिक्षाचालकांना न थुंकण्याबाबत जनजागृती करण्यात आली. या वेळी पोस्टर्सचेही वाटप करण्यात आले. प्रबोधनात्मक पोस्टर्स रिक्षांमध्ये लावून चालकांसह प्रवाशांनादेखील याचे मार्गदर्शन करण्यात आले. थुंकण्यामुळे पसरणारे जंतू आणि त्याचा आरोग्यावर होणारा विपरित परिणाम टाळण्यासाठी शहरात मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी विविध प्रकारचे प्रबोधनात्मक साहित्य तयार करण्यात आले असून त्याचे वाटप करण्यात आले आहे.

शहरात उघड्यावर थुंकल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात. थुंकण्याची सवय बदलली जाण्यासाठी चळवळ राबवण्यात येत आहे. यामध्ये पोस्टर्स, कार्यक्रम आणि वेगवेगळया माध्यमातून प्रबोधन करण्यावर भर दिला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details