महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी, नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आयुक्तांचे आवाहन

वेधशाळेने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण परिसरात पुढील चार तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दुपारी ३ वाजून ३५ च्या सुमारास ४.५८ मीटरची भरती येणार असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

By

Published : Aug 3, 2019, 10:21 AM IST

ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी, नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आयुक्तांचे आवाहन

ठाणे -जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी पालिका हद्दीमधील सर्व शाळांना सुट्टी जाहिर केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी, नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आयुक्तांचे आवाहन

वेधशाळेने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण परिसरात पुढील चार तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दुपारी ३ वाजून ३५ च्या सुमारास ४.५८ मीटरची भरती येणार असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले.

महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी अलर्ट राहून स्थानिक नगरसेवकांच्या समन्वयाने नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने दूर करण्याचे आदेशही जयस्वाल यांनी दिले आहेत. शहरात आज सकाळपासून जवळपास १०० मिमि पावसाची नोंद झाली आहे. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे त्या ठिकाणी तात्काळ आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेचे अधिकारी त्या-त्या परिसरात कार्यरत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details