मुंबई - मुंबईच्या लोकल सेवेला गती मिळावी म्हणून ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला होता. मात्र, मागील १३ वर्षांपासून या प्रकल्पाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने प्रकल्पाची गती कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम डिसेंबर महिन्याअखेरपर्यत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे.
४८ किंवा ७२ तासांचा घेणार ब्लॉक
मुंबईतील रेल्वे विकास प्रकल्पासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-2 (एमयुटीपी) मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. मात्र, त्यात अडथळे येत गेल्याने अजूनही हा प्रकल्प रखडत होता. आता ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकल्पांना २००८ साली मंजुरी मिळाली. तरीही निधी, जागेचे नियोजन, नागरिकांचे पुनर्वसन अशा अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडला. तर, प्रकल्पांच्या कामांनी मार्च २०२१ मध्ये वेग धरला होता. यापैकी ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचा प्रकल्प विविध कारणांनी रखडला. या प्रकल्पातील रुळाचे काम गेल्या एप्रिल महिन्यात पूर्ण होऊन ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची कामे डिसेंबर पर्यत पूर्ण केली जाणार होती. २३ मार्चपासून कोरोनामुळे प्रकल्पाचे काम थांबले. अनलॉकमध्ये या मार्गाच्या कामाला वेग दिला. ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मुंब्रा येथे खाडीवर पुल बसविला आहे. आता दाेन्ही दिशेला रुळांची जाेडणी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ४८ किंवा ७२ तासांचा असेल.
५०२ कोटी रुपये खर्च
हा मार्ग सुमारे ९.८ किमीचा असून २०१९ पर्यंत ही मार्गिका पूर्ण होणार होती. २०२०-२१ पर्यंतही मार्गिका पूर्ण होणार, असा दावा करण्यात आला आहे. यामार्गिकेमुळे मेल/एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका मिळणार असल्याने लोकल वाहतुकीतील अडचणी दूर होण्यास मदत होईल. याप्रकल्पाची अगोदरची डेडलाइन डिसेंबर २०१७ ची होती. पण त्यास विविध कारणांनी विलंब झाला आहे. दरम्यान ठाणे ते दिव्यातील पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर या पट्ट्यात सुमारे जादा १०० फेऱ्या चालविल्या जाउ शकतात, असा अंदाज आहे. या ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च १४० कोटी रुपये होता. मात्र प्रकल्प रखडल्याने सुमारे ५०२ कोटी रुपये खर्च लागला आहे.
ठाणे-दिवा पाचव्या -सहाव्या मार्गिका डिसेंबर अखेरपर्यत होणार पूर्ण
मुंबईतील रेल्वे विकास प्रकल्पासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-2 (एमयुटीपी) मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. मात्र, त्यात अडथळे येत गेल्याने अजूनही हा प्रकल्प रखडत होता. आता ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिकेचे काम सुरू आहे.
प्रकल्पाचे वैशिष्ट्य
सध्या कुर्ला ते ठाणे आणि दिवा ते कल्याण दरम्यान पाचवा-सहावा मार्ग कार्यरत आहे. ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या - सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पुर्ण झाल्यास उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्याच्या गाड्यांची वाहतुक वेगवेगळ्या रेल्वे ट्रॅकवरुन करणे सोयीचे होणार आहे. ठाणे ते दिवा दरम्यान टाकण्यात येत असलेला पाचच्या -सहावा रेल्वे मार्ग हा ठाणे ते दिवा दरम्यानच्या धिम्या मार्गाला जोडून आले. हा मार्ग नंतर जलद गाड्यांसाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पातील मुंब्राजवळ दिड किलोमीटरचा उन्नत मार्ग, रुळांसह अन्य तांत्रिक कामे सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.
हेही वाचा -आता सीबीआयने अनिल देशमुखांबाबत आलेल्या बातम्या अन् व्हायरल रिपोर्टबाबत खुलासा करावा - नवाब मलिक