ठाणे :शिवसेनेतून विद्रोह करून शिवसेनेच्या बंडखोर 40 आमदार ( Rebel MLAs ) यांच्यासह स्वतंत्र गट बनवून भाजप प्रणित सरकारस्थापन झाले आणि विद्रोही गटाचे नायक एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधीही पार पडला. तर 106 आमदार असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. यावरून भाजपचा शिवसेना फोडण्याचा नाही पण शिवसेना संपविण्याचा डाव उघड झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) झाले. आता सत्तेत वाट्याची वाट पाहणाऱ्या विद्रोही सेनेच्या आमदारांची नियुक्ती महत्वाची आहे. विद्रोही शिवसेनेला राज्यात मंत्रिपदाची संधी तर केंद्रात आणि राज्यात मंत्रिपदाची लयलूट असल्याची सूत्रांची माहिती आहे. विद्रोही सेनेतील आमदारांना मंत्रिपद, महामंडळे देऊन त्यांचे पुनर्वसन आणि सांत्वन करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाण्यात चार मंत्रीपदे, आणि केंद्रात 2 मंत्रीपदे देण्यात येणार आहेत. त्यामुळे आजवर कधी नाही तेवढा मान ठाण्याला देण्यात येणार आहे. विद्रोही सेनेच्या अन्य आमदारांचा ही सन्मान मंत्रीपदे आणि महामंडळावर नियुक्ती करून करण्यात येणार आहे.
विद्रोही सेनेच्या पुनर्वसनानंतर 106 आमदार असलेल्या भाजपच्या काही आमदारांनाही मंत्रिपद देण्यात येणार आहे. त्यात ठाण्यात विद्रोही चार ठाणेकर आमदारांना मंत्रीपदे तर ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या आमदारासही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यातून आमदार संजय केळकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. संजय केळकर ठाण्यातील भाजपचा एक कार्यसम्राट आमदार आहे. सर्वपक्षीय आमदार अशी त्यांची ओळख आहे. ठाण्यात एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या अस्तित्वाचे प्रतीक म्हणजे संजय केळकर असे म्हटले जाते. त्यामुळे केळकर यांची वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. संयमी, सोज्वळ, सर्वसामान्यांना कधीही उपलब्ध होणारा, प्रसिद्धी माध्यमापासून दूर असलेले व्यक्तिमत्व यंदाच्या मंत्री मंडळात ठाणेकरांना लाभणार आहे. त्यामुळे ठाण्यात यंदाच्या मंत्रिमंडळात पाच मंत्री, राज्यमंत्री लाभणार असून मुख्यमंत्री ही ठाण्याचा लाभलेला आहे.
ठाणे होणार मंत्र्यांचे आणि राज्याचे केंद्र -ठाणे कालपर्यंत तलावांचे, अनधिकृत इमारतींचे शहर होते. मात्र, यंदा ठाण्यात मंत्रिपदाची लयलूट आणि ठाण्याला पाच मंत्रीपदे केबिनेट, राज्यमंत्री पदे आणि जिल्ह्यात अनेक महामंडळे राहणार आहेत. त्यामुळे मुंबई जरी देशाची आर्थिक राजधानी असली तरीही मुंबई लगतचे ठाणे शहर हे मंत्र्यांचे ठाणे, आणि राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सिद्ध होणार आहे. कारण पाच मंत्री यात केबिनेट, राज्यमंत्री, आणि मुख्यमंत्री हे ठाण्याचे असल्याने ठाणे मंत्र्यांचे शहर झालेले असेल.