महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gandhi Jayanti 2022 : 'या' कलाकाराने दगडावर साकारला गांधीजींचा हुबेहूब चेहरा ; गांधी जयंतीनिमित्त कलेच्या माध्यमातून अभिवादन - Thane artist created Sculpture of Gandhijis

ठाण्यातील कलाकार सुमन दाभोळकर यांनी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त चक्क एका दगडातून महात्मा गांधी यांचा शिल्प तयार केला (Thane artist created Sculpture of Gandhijis) आहे. आज गांधी जयंतीनिमित्त त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून गांधीजींना अभिवादन करण्याचा प्रयत्न केला (Thane artist saluted Gandhiji) आहे.

Thane artist created Sculpture of Gandhijis
ठाण्यातल्या कलाकाराने दगडावर साकारला गांधीजींचा हुबेहूब चेहरा

By

Published : Oct 2, 2022, 3:42 PM IST

ठाणे :कलाकाराला त्याची कला जोपासण्यासाठी त्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या गोष्टी मिळाल्या, तर त्यातून तो काय करू शकतो ? याचा एक अनोखा प्रत्यय ठाण्यात पाहायला मिळाला आहे. ठाण्यातील कलाकार सुमन दाभोळकर यांनी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त चक्क एका दगडातून महात्मा गांधी यांचा शिल्प तयार केला (Thane artist created Sculpture of Gandhijis) आहे. आज गांधी जयंतीनिमित्त त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून गांधीजींना अभिवादन करण्याचा प्रयत्न केला (Thane artist saluted Gandhiji) आहे.

प्रतिक्रिया देताना कलाकार सुमन दाभोलकर

निसर्ग भला मोठा कॅनव्हास -आपल्याकडे निसर्गाने जे सहज उपलब्ध करून दिलं आहे, साधं सोपं असं काहीतरी कलेच्या माध्यमातून नव्याने समोर आणावं. ह्या हेतूने सुमन यांनी दगडांवर काम करायला सुरुवात केली. त्यातून मग विविध आकार जन्मास येऊ लागले. प्राणी,कार्टून्स, मासे, विविध वस्तू उलगडून समोर येऊ लागल्या. कला, क्रीडा, विज्ञान ह्या क्षेत्रांतील मातब्बर व्यक्तींचे चेहरे मी दगडात साकारले आहेत. त्यात शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले, जगप्रसिद्ध वैज्ञानिक आइन्स्टाइन, एपीजे अब्दुल कलाम, अभिनेता नसिरउद्दीन शाह, नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, स्वप्नील जोशी, क्रिकेटपटू विराट कोहली, सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कपिल देव, ओशो, रतन टाटा, कविवर्य नारायण सुर्वे इत्यादीं अनेक मान्यवरांच्या रंगशिल्पांचा समावेश आहे. चिकित्सा, जिज्ञासू वृत्ती दगडांत अधिक काहीतरी शोधू लागली. मग त्यातून साकारले गेले निरनिराळे चेहरे. अर्थात दगड ही जी काही निसर्गाची निर्मिती आहे, त्यातून एक रंगशिल्प साकारलं जातंय हे भावतं. निसर्ग हा एक भला मोठा कॅनव्हास आहे. तो खूप काही शिकवत असतो, असे सुमन यांचे मत (occasion of Gandhi Jayanti) आहे.


निसर्गाचा मनावर कलात्मक परिणाम -सिंधुदुर्गातला निसर्ग नेहमीच भुरळ पाडतो. हल्ली कोरोना महामारीमुळे इतके दिवस गावी मुक्काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे चोहोबाजूंनी बहरलेला हा निसर्ग मी रोज न्याहाळतोय. नदी, नाले, ओहोळ, डबकं, झाडं, शेती, गवत, डोंगर, पायवाटा, माळरानावर चरणाऱ्या गाई, म्हशी, रेडे ह्यात एक प्रकारचं सौंदर्य नेहमीच खुणावत असतं. ते पाहून एक विशिष्ट प्रकारचं समाधान देखील लाभतं. एक कलाकार म्हणून आजूबाजूला असणाऱ्या ह्या बाबी मनावर कलात्मक परिणाम नेहमीच साधत असतं. दररोज संध्याकाळी पायी पायी एका नदीवर फिरायला जाताना, घरापासून साधारणतः पाऊण-एक तासावर असलेल्या नदीवर असलेला निसर्ग कलात्मक नजरेने न्याहाळत ही आवड आणखी जोपासली गेली. त्यातून या शिल्पाच्या असंख्य कल्पना मनात आल्या, आणि या प्रवासाला सुरवात झाल्याचे सुमन (Sculpture of Gandhijis on stone) सांगतात.

ABOUT THE AUTHOR

...view details