ठाणे - नशीब बलवत्तर म्हणून लिफ्टमध्ये अडकलेल्या 65 वर्षीय आजीबाई सुखरूप बचावल्या आहेत. विशेष म्हणजे अर्ध्यातासाच्या अथक प्रयत्नानंतर कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी आजीबाईची सुखरूप सुटका केली. ही घटना कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील वोलगा नावाच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये घडली आहे.
कल्याण पश्चिम परिसरात पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील इमारतीची लिप्ट अचानक बंद पडली. त्यामध्ये एक 65 वर्षीय आजीबाई अडकून पडल्या होत्या. विशेष म्हणजे आजीबाई लिफ्टमध्ये गेली आणि अचानक लिफ्ट बंद झाली होती. आजीबाई लिफ्टमध्ये अडकल्याचे समजताच सोसायटीतील रहिवाशांनी लिफ्ट सुरू करण्याचे आणि या महिलेला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न निष्फळ ठरले. विशेष म्हणजे या लिफ्टचे दरवाजेही काही केल्या उघडत नव्हते.
रहिवाशांनी टाळ्या वाजवत एकच जल्लोष-