महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शहापुरात बसची जागीच पलटी, १२ शाळकरी विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी जखमी

शहापुर तालुक्यातील नेहरोली-जांभे रस्त्यावर शाळकरी विद्यार्थिनी प्रवासी असलेल्या बसचा अपघात झाला. यात बस जागीच पलटी झाली असून १० ते १२ विद्यार्थीिनींसह अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत.

शहापुरात बसची जागीच पलटी, १२ शाळकरी विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी जखमी

By

Published : Sep 19, 2019, 7:20 PM IST

ठाणे -शहापुर तालुक्यातील नेहरोली-जांभे रस्त्यावर शाळकरी विद्यार्थिनी प्रवाशी असलेल्या बसचा अपघात झाला. यात बस जागीच पलटी झाली असून १० ते १२ विद्यार्थिनींसह अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रस्ता खचल्याने बस पलटी झाल्याची माहिची समोर आली आहे तर, प्रवाशांच्या आक्रोशाचा सरकारला आता सामना करावा लागणार असल्याची चर्चा परिसरात होती.

शहापुरात बसची जागीच पलटी, १२ शाळकरी विद्यार्थ्यांसह अनेक प्रवाशी जखमी

हेही वाचा - 'चांद जमीन पर', मुंबईच्या रस्त्यांवर आरजे मलिष्काचं नवं गाणं एकदा पाहाच!

नेहरोली गावातून शहापूरला जाणाऱ्या एसटी बसमध्ये एकुण ४० प्रवासी होते. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या लेनाड-जांभे-नेहरोली येथील रस्ता 1 कोटी 92 लाख रुपयांचा खर्च वापरुन केलला होता. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून केल्यामुळे दोन महिन्यात रस्त्याची चाळण झाली आहे. तर काही ठिकाणी या रस्त्याच्याखाली असलेली माती रोडवर आल्याने रस्ता खचत आहे. तसेच रस्ताही अरुंद केल्यामुळे बस पलटी झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा - काँग्रेसचा मास्टरप्लान ! त्यामुळे पक्ष राज्यात पुन्हा मारणार मुसंडी?

जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी ठेकेदाराला घेऊन येत नाहीत. तोपर्यंत अपघातग्रस्त बस जागेवरून काढून देणार नसल्याचे गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अपघातानंतर काहीवेळात गावकरी मदतीला धावून आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details