महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Robber Gang Arreated : डॉक्टरच्या घरावर असा टाकला फिल्मीस्टाईल सशस्त्र दरोडा; ९ जण गजाआड - शिवाजीनगर पोलीस

डॉक्टरच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ पूर्व परिसरात असेलेल्या रुग्णालयात घडली (robbed doctor house in Ambernath) होती. या दरोड्यातील ९ जणांना गजाआड करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले (Shivajinagar police seized gang of robbers) आहे.

Robber Gang Seized
डॉक्टरच्या घरावर दरोडा टाकणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड

By

Published : Oct 18, 2022, 9:23 AM IST

Updated : Oct 18, 2022, 9:47 AM IST

ठाणे : एका खाजगी रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टरच्या घरावर तब्बल 1 कोटी रुपयांच्यावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ पूर्व परिसरात असेलेल्या रुग्णालयात घडली (robbed doctor house in Ambernath) होती. या दरोड्यातील ९ जणांना गजाआड करून त्यांच्याकडून ६४ लाखांच्यावर दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले (Shivajinagar police seized gang of robbers) आहे.


दरोड्याची मास्टरमाईंड लॅब टेक्निशन -धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णालयात लॅब टेक्निशन असलेली महिला या दरोड्या मागे मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. सौ. ज्योती प्रदीप सालेकर (वय ३४, रा. )असे अटक महिलेचे नाव आहे. तर दरोड्यातील चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या २ सोनारांची अटक केली आहे. तसेच चेतन विजय दुधाने (वय ३०) हरिष मधुकर घाडगे (वय २८) अक्षय गोवींद जाधव (वय २६)कुणाल विश्वनाथ चौधरी (वय २१) दीपक मधुकर वाघमारे (वय ४२)तुषार उर्फ बाळा सोळसे (वय ४१) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे (Robber Gang Arreated ) आहेत.

प्रतिक्रिया देताना अप्पर पोलीस आयुक्त, दत्ता शिंदे

चाकूचा धाक दाखवून लुटपाट - अंबरनाथ मधील कानसई भागात उषा नर्सिंग होमचे डॉक्टर हरीश आणि उषा लापसीया यांच्या रुग्णालयात वरच्या मजल्यावर असलेल्या घरावर ११ जुलै २०२२ रोजी रात्री साडेअकराच्या दरम्यान दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. दरोडेखोर पहिले रुग्णालयात घुसुन रुग्णांना चाकूचा धाक दाखवून लुटपाट केली. त्यानंतर रुग्णालयामधील आया आणि नर्सलाही चाकूचा धाक दाखवून त्यांचे मोबाईल काढून घेतले. रुग्ण अरोडाओरडा करून नये, म्हणून या रुग्णांना एका खोलीत कोंडून ठेवले आणि त्यानंतर हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर डॉक्टरांच्या घरामध्ये घुसले (robbed doctor house) होते.


दागिने तिजोरीसह घेऊन पसार -डॉक्टरांच्या घरात घुसताच तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवत दरोडेखारांनी डॉक्टरांच्या घरातील डिझिटल तिजोरी त्याचबरोबर सीसीटीव्हीचा डीव्हीआर दरोडेखोरांनी ताब्यात घेतला. तिजोरीत तब्बल १ कोटीच्यावर सोने आणि हिऱ्यांचे दागिने होते. डॉ दाम्पत्य दरोडेखोरांना घाबरले, आणि तिजोरी कुठल्या खोलीत ठेवलेली आहे, हे सांगितले. त्यानंतर दरोडेखोरांनी तिजोरी घेऊन कारमध्ये बसून पसार झाले होते.

फिल्मी स्टाईलने दरोडा - शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह उल्हासनगर झोनचे अनेक पथक या दरोडेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यातच विठ्ठल वाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल रजपूत यांना खबऱ्यामार्फत या दरोड्यातील माहिती मिळताच त्यांनी सुरवातीला दोन आरोपींना अटक केली. त्यानंतर दरोड्यामधील मास्टरमाईंड असलेल्या लॅब टेक्निशन ज्योतीचे नाव समोर आले. ज्योती अनेक महिन्यापासून डॉ. लापसीया यांच्या रुग्णालयात लॅब टेक्निशन कामाला होती. यामुळे तिला डॉक्टरांच्या घरात किती दागिने आणि कुठं ठेवले याची संपूर्ण माहिती होती. त्यातच काही महिन्यापूर्वी तिने लॅबमधील रक्कमेचा अपहार केल्याने तिला कामावरून डॉ. लापसीया यांनी काढून टाकले होते. तेव्हापासूनच तिने दरोडेखोरांना दरोडा टाकण्यासाठी मदत करून रुग्णालय व डॉक्टरांच्या घरातील संपूर्ण माहिती दिली. त्यानुसार प्लन रचून फिल्मी स्टाईलने रात्रीच्या सुमारास दरोडा टाकून दरोडेखोर फरार झाले होते.

मुद्देमाल जप्त -दरोड्यात १ कोटी १ लाख ८६ हजारांचे दागिने व रोकड घेऊन फरार झाले होते. त्यानंतर भिवंडी व बदलापुरात सोने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन सोनारांनी चोरीचे दागिने विकत घेतले होते. या दागिन्यांपैकी अटक आरोपींकडून पोलिसांनी ५८ लाख ३१ हजाराचे दागिने, ७ महागडे मोबाईल, आणि गुन्ह्यात वापरलेली ३ लाख ७० हजाराची कारही जप्त करून आतापर्यंत असा एकूण ६४ लाख ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींकडून दरोड्यातील उर्वरित मुद्देमालही हस्तगत करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी दिली (Shivajinagar police) आहे.

Last Updated : Oct 18, 2022, 9:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details