ठाणे -ठाणे महापालिकेच्या मागील निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी देऊ अशी घोषणा केली होती. ही करमाफी सरसकट देण्यात येईल, असे सांगत मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, फक्त ३१ टक्केच सामान्य कर माफ करण्यात आला असून पालिका प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाणेकरच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. त्यामुळे एकीकडे सत्ताधारी शिवसेनेने आश्वासन म्हणजे एकप्रकारे फसवणूक केल्याचा आरोप यावेळी भाजपने केला आहे. तर कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधारी काही ही बोलतील परंतु ठाणेकर खुश आहेत, असे शिवसेना पदाधिकारी सांगत आहेत .
ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेने नागरिकांना दिला दिलासा, करात 31 टक्के सुट
ठाणे महापालिकेच्या १९ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी करण्याचा ठराव मंजूर झाला होता. त्यावेळी मोठ्या अविर्भावात शिवसेनेच्या ठाण्यातील स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेने केलेल्या वचनपूर्तीची आठवण करून दिली होती. मात्र, आता मालमत्ता करातील सामान्य करामध्ये केवळ ३१ टक्के माफी देत शिवसेनेने फसवी मालमत्ता करमाफी दिली असल्याची भावना यावेळी सामान्य ठाणेकरांनी व्यक्त केली आहे. तर काही नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केला आहे.
करमाफी सरसकटची घोषणा - ठाणे महापालिकेच्या मागील निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी देऊ अशी घोषणा केली होती. ही करमाफी सरसकट देण्यात येईल असे सांगत मोठा गाजावाजा करण्यात आला होता.मात्र, फक्त ३१ टक्केच सामान्य कर माफ करण्यात आला असून पालिका प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाणेकरच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. त्यामुळे एकीकडे सत्ताधारी शिवसेनेने आश्वासन म्हणजे एकप्रकारे फसवणूक केल्याचा आरोप यावेळी भाजपने केला आहे.तर मुख्यमंत्री व नगरविकास मंत्रीपद शिवसेनेकडेच आहे. मालमत्ता करमाफीचा विषय हा मंजुरीसाठी दोन्ही नेत्यांकडेच होता. अशा परिस्थितीत संपूर्ण मालमत्ता करमाफी करण्याचे धोरण मान्य करताना `अडले कुठे, असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी विचारला. सतत २५ वर्षांपासून सत्ता देणाऱ्या मुंबई-ठाण्यातील सामान्यांना करमाफीचा दिलासा देताना महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेने ठाम भूमिका का घेतली नाही असा टोलाच डावखरे यांनी सत्ताधार्यांना लगावला आहे.
सत्ताधारी समाधानी -शिवसेना नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत करत मंत्र्यांचे आभार मानले आहे . तर करोनामुळे आम्ही सध्या ३१ टक्के सामान्य करमध्ये सूट दिली आहे .मुंबईच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे आणि विरोधक काही ही म्हणो ,ठाणेकर या निर्णयामुळे खुश आहेत असे ठाण्याचे माझी महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे.
31 टक्के दिलासा मिळाला -ठाणे महापालिकेच्या १९ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी करण्याचा ठराव मंजूर झाला होता. त्यावेळी मोठ्या अविर्भावात शिवसेनेच्या ठाण्यातील स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेने केलेल्या वचनपूर्तीची आठवण करून दिली होती. मात्र, आता मालमत्ता करातील सामान्य करामध्ये केवळ ३१ टक्के माफी देत शिवसेनेने फसवी मालमत्ता करमाफी दिली असल्याची भावना यावेळी सामान्य ठाणेकरांनी व्यक्त केली आहे. तर काही नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केला आहे. ३१ टक्के का होईना कर माफी झालीय यात ठाणेकरांनी समाधान मानले आहे.
आश्वासन नाही पाळले पण दिलासा दिला -मालमत्ता करात वेगवेगळे कर समाविष्ट करण्यात येत असतात. त्यानुसार यातील ३१ टक्के सामान्य करमाफ झालेला आहे. एकूणच आता ज्यांचे बील १८ हजारांच्या आसपास वार्षिक होते, त्यांना आता १२ हजारांच्या आसपास बील येईल असा अंदाज वर्तविला जात आहे.महापालिका हद्दीत ५ लाख ६० हजार करदाते आहेत. परंतु त्यातील ५०० चौरस फुटपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मालमत्तांचा सव्र्हे सुरु आहे. ज्यांची माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यांची बिले नव्या नियमानुसार तयार करण्यात आली आहेत. परंतु अद्यापही ७० हजार मालमत्ता अशा मालमत्ता आहेत, ज्यांची वर्गवारी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे नेमका किती कर दात्यांचा मालमत्ता करातील सामान्य कर माफ झाला हे महापालिकेला सांगता येत नसल्याचे दिसत आहे. असे असले तरी देखील महापालिकेला ४५ कोटींच्या आसपास वार्षिक बोजा पडणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.