ठाणेरूम पार्टनर म्हणून एकत्र राहणाऱ्या दोन मैत्रिणीमधून एकीने चालबाजी करून झोपेत असलेल्या मैत्रिणीच्या मोबाईलमधून मित्राच्या बँक खात्यात गुपचप रक्कम वळती केल्याचा phone pay by friend stealing प्रकार समोर आला आहे. हा प्रकार डोंबिवली पूर्वेकडील एका हायप्रोफाईल सोसायटीत घडला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात Tilaknagar Police Station चालबाज मैत्रिणीवर सायबर गुन्ह्यासह चोरीचा गुन्हा Cyber crime दाखल करून, पोलिसांनी Tilaknagar Police तपास सुरु केला आहे.
मित्राच्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर केल्याचे समोर तक्रारदार आणि आरोपी मैत्रीण या दोघी खाजगी कंपनीत कामाला असून, त्या गेल्या काही महिन्यापासून डोंबिवली पूर्व भागातील संगीतावाडी परिसरातील एका हायप्रोफाईल सोसायटीच्या फ्लॅटमध्ये भागीदारी पध्दतीने भाडे तत्वावर दोघी एकत्र राहतात. Thane Crime त्यातच सोमवारी दोघी मैत्रिणी कामावरुन सायंकाळी घरी परतल्यानंतर दोघीही रात्रीचे जेवण आटपून झोपी गेले होते. मात्र, चालबाज मैत्रीण पहाटे 3 वाजेच्या सुमारास गुपचूप उठून मोबाईल चोरून घेतला. त्यानंतर मैत्रीणीच्या मोबाईल मधील फोन पे वापर करुन त्यामध्ये प्रियंकाचा कोड वापरुन तिच्या बँक खात्यामधून 28 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफरने मित्राच्या बँक खात्यावर वळते केले आहे. त्यानंतर ती रक्कम चालबाज मैत्रीणीने मित्राच्या माध्यमातून स्वताच्या बँक खात्यावर वळते करुन घेतले आहे.