ठाणे - एका नराधम रिक्षाचालकाने पीडित विवाहितेचे रिक्षातून अपहरण करत तिला निर्जनस्थळी असलेल्या खोलीत डांबून तिच्यावर सतत दोन दिवस मारहाणीची धमकी देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पडघा पोलिसांना यश आले आहे. शारदाप्रसाद देवमडी मिश्रा (वय ५५, रा. खडवली) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.
पीडितेचे रिक्षातून अपहरण
भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली गावात २५ वर्षीय पीडिता कुटुंबासह राहते. ती गुरुवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे धुणी-भांड्याचे काम करण्यासाठी आपल्या सासुबरोबर जात होती. मात्र त्या दिवशी तिची तब्बेत नव्हती. परंतू काही वेळाने तिला बरे वाटल्याने ती सकाळच्या सुमारास कामाला जात असताना आरोपी रिक्षाचालक शारदा प्रसाद याने तिला रस्त्यातच गाठून जबरदस्तीने रिक्षात बसवून तिचे अपहरण केले. मात्र तिची तब्बेत बरी नसल्याने ती चक्कर येऊन रिक्षात झोपली. त्यानंतर शुद्धीवर आली त्यावेळेस ती एका खोलीत विवस्त्र अवस्थेत होती. तसेच आरोपी रिक्षाचालकदेखील विवस्त्र अवस्थेत होता. हे पाहून पीडिता भयभीत झाल्याने तिला धक्काच बसून तिला समजले की या नराधमने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
दोन दिवस बंद खोलीत डांबून अत्याचार
पीडिताने रिक्षाचालकास घरी जायचे असल्याचे सांगितले, परंतू या नराधम रिक्षाचालकाने तिला मारहाणीची धमकी देत त्या खोलीत कोंडून तो सायंकाळी कुठेतरी बाहेर गेला असता पीडितेने तिच्या पतीस मोबाइलवरून फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅलन्स नसल्याने संपर्क झाला नाही. काही वेळाने हा नराधम पुन्हा घटनस्थळी आला व त्याने तिच्यावर पुन्हा बळजबरीने अत्याचार केला.