महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विशेष : पोलिसांनी दुकानातील सर्व वस्तू नेल्या, सचिन वाझे यांनी चौकशी केलेल्या दुकानदाराचा खुलासा - मनसुख हिरेन प्रकरण

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांसह आढळलेल्या गाडीत ज्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सतगुरु कार डेकोरेटरच्या दुकानातून बनवल्या गेल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Satguru Car Decorator
Satguru Car Decorator

By

Published : Mar 15, 2021, 4:44 PM IST

ठाणे -मनसुख हिरेन प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत असून आता नवीन माहिती समोर आलेली आहे. ती म्हणजे कार गाडी अंबानींच्या घराशेजारी मिळाली. ती गाडी मनसुख हिरेन यांची होती. त्या गाडीत जिलेटिन कांड्या होत्या. गाडीत ज्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सतगुरु कार डेकोरेटरच्या दुकानातून बनवल्या गेल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय म्हणाले दुकान मालक -
हे दुकान ज्यांचे आहे. त्या मालकाकडे प्रकरणाविषयी विचारपूस केली असता, त्यांनी संगितले, की मनसुख हिरेन माझ्याकडून नंबर प्लेट बनवण्याची ऑर्डर देत असे आणि मी त्या पद्धतीने त्यांना नंबर प्लेट बनवून दिल्या. मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे त्यांचेही कार डेकोरचे दुकान आहे. दुकान मालक नवीन तलरेजा यांनी सांगितले, की माझ्या दुकानातून सर्व दुकानदार नंबर प्लेट्स बनवून घेऊन जातात. मनसुख यांनीही नंबर प्लेट बनवून दिल्या होत्या. नेमकं आता लक्षात नाही, माझ्या दुकानात दोन वेळा पोलीस आले. एकदा सचिन वाझे स्वतः आले होते. त्यांच्या सोबत चार पोलीस होते. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा टीम आली त्यावेळी पाच जण होते पण सचिन वाझे नव्हते. त्या टीमने सर्व गोष्टी सोबत नेल्या. माझी डायरी, रेकॉर्ड्स सगळे घेतले, सीसीटीव्ही घेतले, आता माझ्याकडे काहीच डेटा नाही, सर्व ते लोक घेऊन गेले, पुन्हा चौकशी झाली नाही, एनआयए, एटीएस अजून आले नाहीत. दोन वेळा मुंबई क्राईम ब्रँच येऊन गेली तेवढेच. सचिन वाझे यांनी चौकशी केली. लायसेन्स वगैरे चेक केले. कुणाचे फोन वगैरे आले नाही मला, असे नवीन तलरेजा यांनी सांगितले.

हे ही वाचा - भारत-पाकच्या सिंधू आयोगाची बैठक येत्या 23 आणि 24 मार्चला

इतर कोणी चौकशीला बोलावले नाही -
मुंबई गुन्हे शाखा सोडली तर इतर कोणत्याही तपास यंत्रणेने यांना चौकशीसाठी बोलावलेले नाही. सचिन वाझे यांनी दोनदा चौकशी केली आणि तिसऱ्यांदा बोलावून घेतले व जबाब नोंदवला, अशी माहिती नवीन यांनी दिली आहे. नवीन यांच्या दुकानात एकदा सचिन वाझे येवून चौकशी करुण गेले आहेत, अशी माहितीही नवीन यांनी दिली आहे.

तर याच दुकानाच्या ठिकाणी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी..

आमच्या प्रतिनिधीने दुकान मालकाशी केलेली बातचीत

हे ही वाचा - नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पोलीस आयुक्तांचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details