महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिव्यातील 8500 लोकांना 7 बोटींच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलवले - अग्निशमन दल

टीडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, आपत्कालीन कक्ष, आर्मी पथकाने 7 बोटींच्या सहाय्याने लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले.

बचावकार्य

By

Published : Aug 5, 2019, 12:00 AM IST

ठाणे- जिल्ह्यातील बारवी धरण पूर्ण भरल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिवा प्रभागामधून रविवारी 8500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.

बचावकार्य
दिवसभरात 7 बोटींच्या साहाय्याने टीडीआरएफ, आर्मी, पोलीस, अग्निशमन दल, आपत्कालीन यंत्रणेच्या मदतीने जवळपास 8,500 लोकाना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.दरम्यान, या ठिकाणी रहिवाशांना स्थानिक नगरसेवकांच्या समन्वयातून सर्वतोपरी मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना इमारतींच्या वरच्या मजल्यावर थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत हे मदतकार्य सुरू होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details