ठाणे -सध्या कॉरोनचाच विषय सगळीकडे चर्चिला जात असून कुठेही बघितले, तरी या विषयाशिवाय दुसरा कुठला विषयच ऐकू येत नाही आहे. टीव्हीपासून सोशल मीडियापर्यंत फक्त कोरोनाचीच हवा आहे. प्रत्येक जण आपापल्या कलेतून काहीतरी नाविन्यपूर्ण देऊ पाहतोय. ठाण्यातील "कलाकार्स" या ग्रुपनेदेखील रॅपच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा जणू चंगच बांधला आहे.
ठाण्यातील युवकांच्या कोरोना रॅप धमाल गाण्यावर युवापिढी खुश
युवापिढीमध्ये या विषयावर जनजागृती करायची असेल, तर रॅपपेक्षा सोपे माध्यम नाही, असा विचार करून या ग्रुपचे फॉउंडर यज्ञेश दौंड आणि पार्थ बारघोडे यांनी एक जबरदस्त रॅप सॉंग बनवले आहे. कोरोनापासून वाचन्यासाठी न घाबरता काय काय खबरदारी घेतली पाहिजे, याचे वर्णन या गाण्यात केलेले आहे.
कोरोना रॅप ठाण्यातील युवकांच्या धमाल गाण्यावर युवापिढी खुश