ठाणे - राज्यातील ७ ते १० वर्षे शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना सोडण्याचा निर्णय झाला असून याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली. ते आज ठाणे जिल्हा दौऱ्यावर होते.
'कैद्यांना त्यांच्या घरांपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली जाईल' - home minister anil deshmukh in thane
ठाणे जिल्ह्यातील तरुंगामधील जवळपास साडे तीन हजार पेक्षा जास्त कैद्यांना सोडण्यात येणार असून त्यांना जेल बाहेर सोडले जाणार नाही, तर त्यांना थेट त्यांच्या घरांपर्यंत पोहोचविण्याकरिता विशेष व्यवस्था देखील करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील तरुंगामधील जवळपास साडे तीन हजार पेक्षा जास्त कैद्यांना सोडण्यात येणार असून त्यांना जेल बाहेर सोडले जाणार नाही, तर त्यांना थेट त्यांच्या घरांपर्यंत पोहोचविण्याकरिता विशेष व्यवस्था देखील करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली. गृहमंत्री आज ठाणे जिल्हाच्या दौऱ्यावर होते, या दरम्यान त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. आयुक्तालयातील कायदा सुव्यवस्था आणि लाॅकडाऊन बंदोबस्ताची सविस्तर माहिती घेतली. तसेच सायबर गुन्ह्यांबाबत वाढत्या घटना लक्षात घेता, ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना गृहमंत्र्यांनी विशेष सूचना केल्या आहेत.