महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लोकल रेल्वेच्या सीटवर अश्लील मेसेज; प्रवाशांमध्ये संताप - Pornographic messages in local

पनवेलहून दुपारी निघालेल्या स्लो लोकलच्या प्रथम वर्गातील सीटवर "लडकी मिलेगी" असा मजकूर लिहिलेला आढळल्याने खळबळ उडाली. हे लिहिणाऱ्या समाजकंटकाने सदर मजकूरखालीच एक मोबाईल नंबर देखील लिहून ठेवला होता.

THANE
लोकल रेल्वेच्या सीटवर अश्लील मेसेज

By

Published : Jan 19, 2021, 7:46 PM IST

ठाणे -कोरोनाच्या भीतीमुळे गेले जवळपास दहा महिने सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा बंद होती. अत्यावश्यक सेवा देणारे आणि महिलांसाठी लोकल सुरु झाल्या असल्या तरी सरसकट सर्वांसाठी मात्र लोकल प्रवास अजूनही प्रतिबंधित आहे. त्यातच पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या ट्रान्स हार्बरवरच्या लोकल डब्यात अत्यंत निंदनीय प्रकार आढळून आला. पनवेलहून दुपारी निघालेल्या स्लो लोकलच्या प्रथम वर्गातील सीटवर "लडकी मिलेगी" असा मजकूर लिहिलेला आढळल्याने खळबळ उडाली. हे लिहिणाऱ्या समाजकंटकाने सदर मजकूरखालीच एक मोबाईल नंबर देखील लिहून ठेवला होता.

रेल्वे पोलीस अधिकारी

रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू

सदरचा प्रकार हा एखाद्या महिलेची बदनामी करण्यासाठी केला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने हा मजकूर लिहिणाऱ्या समाजकंटकाचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, असे वृत्ती असणाऱ्या लोकांवर आमची नजर असणार आहे. अशा समाजकंटकांना कायद्या्ने एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते तरी कोणीही असा प्रकार करणार नाही. तसेच रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान करू नये असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

या आणि अशा प्रकारचे अनेक अश्लील मैसेज अनेक डब्ब्यात पाहायला मिळतात त्यामुळे आता रेल्वे पोलीस विशेष मोहिम हाती घेवून अशा प्रकारे बदनामी करणाऱ्या आणि विद्रुपिकरण करणाऱ्या लोकांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

बदनामीसाठी करतायेत असे प्रकार

असे प्रकार करणारे एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याला नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने केला जात असल्याचे पोलिसांना तपासात आढळले आहे. अशा माध्यमातून जऱ देहविक्रीचा व्यवसाय जर होत असेल तर त्यासाठी देखील कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा रेल्वे पोलिसांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details